Election voting
Election voting SAKAL
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Voting : आरएलडी, भाजप समर्थकांमध्ये हाणामारी

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान शामलीमध्ये आरएलडी आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्या वृत्ताने प्रशासनातही खळबळ उडाली. गोंधळाची माहिती मिळताच डीएम-एसपीही घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली.

युतीचे उमेदवार प्रसन्ना चौधरी गुरुवारी दुपारी शामली येथील हिंदू गर्ल्स इंटर कॉलेजमधील बूथवर मतदान करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी भाजप (BJP) समर्थकही तेथे आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार आरडाओरडा सुरू झाला. काही वेळातच दोन्ही बाजूंनी बाचाबाची सुरू झाली. मतदानादरम्यान (Voting) झालेल्या गोंधळावर पोलिसांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बघता बघता दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली.

बूथवरील हा गोंधळ कसातरी शांत झाला. यापूर्वी दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी एकमेकांना जोरदार मारहाणही केली. बूथवर गोंधळाची माहिती मिळताच डीएम-एसपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती हाताळली. मात्र, वादाचे कारण समजू शकलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

RCB vs CSK Security Breach : आरसीबी-चेन्नई सामन्यात सुरक्षा भेदण्याचं प्लॅनिंग? सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल

Video: काय बोलावं आता! भर रस्त्यात नाचली 'मंजूलिका'; व्हिडिओ होतोय व्हायरल

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT