PM Modi Criticized samajwadi ANI
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Assembly: आधीच्या सत्ताधाऱ्यांनी राज्याला लुटले; मोदींचा विरोधकांवर प्रहार

पंतप्रधान मोदींनी आज मथुरा, आग्रा आणि बुलदशहर या शहरांमधील मतदारांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तर प्रदेशमधील आधीच्या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या गरजांशी काहीही देणेघेणे नव्हते, राज्याला लुटणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा होता, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर केला. (Uttarpradesh Assembly Election)

पंतप्रधान मोदींनी आज मथुरा, आग्रा आणि बुलदशहर या शहरांमधील मतदारांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. मोदी म्हणाले,‘‘या विधानसभा निवडणुकीत विकास हाच सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असेल, हे जनतेनेच निश्‍चित केले आहे. याआधी जे सत्तेत होते, त्यांनी जनतेच्या गरजांकडे आणि भावनांकडे कधीही लक्ष दिले नाही. राज्याला लुटा हाच त्यांचा अजेंडा होता. मात्र, या लोकांनी पैसा, गुंडगिरी, जातीवाद यांच्या जोरावर कितीही राजकारण केले तरी त्यांना लोकांचे प्रेम मात्र मिळणार नाही. जनतेचे सेवक बनून सेवा करणाऱ्यांनाच जनतेचे आशीर्वाद मिळतील.’’स्वप्नात मला प्रभू कृष्णाचे दर्शन झाल्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही मोदी यांनी टोमणा मारला. भाजपला जनतेचा मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहून काही लोकांना आता भगवान कृष्ण स्वप्नात दिसू लागले आहेत, असे मोदी म्हणाले.

योगींवर विश्‍वास व्यक्त

कोरोना संसर्गस्थितीमुळे उत्तर प्रदेशातील विकासाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला, मात्र जनतेने पुन्हा एकदा संधी दिल्यास योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सर्व नुकसान भरून काढेल, असा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी आज व्यक्त केला. त्याबरोबरच, सत्ता मिळाल्यास योगी आदित्यनाथ हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. राज्यात पुन्हा भाजपलाच मतदार पसंती देतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

चन्नी यांनाच पुन्हा संधी

लुधियाना : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चन्नी यांच्या नावाची घोषणा करताना त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील, हे स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी आज व्हर्च्युअल रॅली घेतली. ‘पंजाबमधील जनतेला गरीब घरातील पंतप्रधान हवा आहे,’ असे सांगत राहुल यांनी काँग्रेसचा त्याग केलेले माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना टोला हाणला. राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मोदी हे पंतप्रधान नसून ‘राजे’ असल्यासारखेच वागतात. त्यांना कधी तुम्ही रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांना मदत करताना पाहिले आहे का?, असा सवाल राहुल यांनी विचारला. काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार निवडताना राज्यातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून मते मागविली होती. तसेच, जनतेचेही मत विचारात घेण्यात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होते. मात्र, काँग्रेसने मवाळ चेहरा असलेल्या चन्नी यांनाच संधी दिली आहे.

राज्यातील पूर्वीच्या सरकारमध्ये स्वत:ची तिजोरी भरण्याचा खेळ सुरु होता. प्रत्येक जण एकत्र हा खेळ खेळत होते, एकत्र खात होते. २०१७ नंतर हा खेळ बंद पडला आहे. पूर्वी कुटुंब हेच सरकार होते, आता संपूर्ण राज्य हे कुटुंब झाले आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

CCTV Crime Footage : पत्नीवरून वारंवार चिडविल्याचा राग मनात धरून पाठलाग करून भर रस्त्यात संपवलं, घटना सीसीटीव्हीत कैद

India vs Pakistan Asia Cup 2025 : आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; दुबईतील भारतीय प्रेक्षकांचाही निरुत्साह, कारण काय?

Truck Accident: देऊळगाव महीजवळील भीषण अपघातात ट्रक पलटी; चालक नागेश दहिफळे यांचा जागीच मृत्यू

Panchang 14 September 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT