UP Election Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Assembly Election: एकाच घरातील नेते एकमेकांविरोधात

उत्तर प्रदेशमधील राजकारणात पक्षाबद्दलची निष्ठा व नातेसंबंध यांना कवडीची किंमत राहत नाही.

सकाळ वृत्तसेवा

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील राजकारणात पक्षाबद्दलची निष्ठा व नातेसंबंध यांना कवडीची किंमत राहत नाही. सत्ता लालसा रक्ताची नातीही एका झटक्यात तोडते आणि निवडणूक काळात एकमेकांविरोधात आव्हान देण्यासही मागेपुढे पाहिले जात नाही. अशी अनेक उदाहरणे सध्या सत्ताधारी भाजपसह विरोध पक्षांमध्ये आहेत. (UttarPradesh Assembly Election Politics Updates)

भाजपला धक्का देणारे स्वामीप्रसाद मौर्य समाजवादी पक्षाच्या रथावर स्वार असून त्यांची कन्या भाजपच्या खासदार संघमित्रा मौर्य देशासाठी भाजप हाच उत्तम पक्ष असल्याचे सांगत आहे. राजकारणात सर्वोच्च स्थानी पोहचण्याच्या जबरदस्त इच्छेपुढे पक्षीय निष्ठाही फिक्या ठरतात. एवढेच नाही तर नातेसंबंधातही राजकारण येऊ लागते.

अशी अनेक राजकीय घराणी राज्यात आहेत, ज्यांचा एक सदस्य एका पक्षात आहे तर त्याच्या विरुद्ध पक्षाशी दुसरा सदस्य निष्ठा वाहत आहे. स्वामी प्रकाश मौर्य आणि संघमित्रा मौर्य हे केवळ एकच उदाहरण नाही तर अशा अनेक राजकीय घराण्यांतील व्यक्ती आज निवडणूक आखाड्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

‘राज’घराण्यांतील राजकीय हवा

मुलायमसिंह यादव परिवाराच्या सून अपर्णा यादव या देशसेवेसाठी ‘सप’सोडून भाजपच्या धत्रछायाखाली आल्या आहेत. मुलायसिंह यांचे साडू प्रमोद गुप्ता हेही भाजपबरोबर आहेत.

आंबेडकर जिल्ह्यातील नेते राकेश पांडे बसपच्या ‘हत्ती’वरून उतरून समाजवादी पक्षाच्या सायकलवर स्वार झाले. त्यांचे खासदार पुत्र रितेश पांडे हे ‘बसप’च्या छायेखाली आहेत.

अपना दल (एस) या पक्षाच्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांनी भाजपशी युती केली आहे. त्यांची आई कृष्णा पटेल व बहीण पल्लवी पटेल यांनी ‘सप’च्या माध्यमांतून आव्हान दिले आहे.

सहारनपूरपूरमधील काँग्रेसचे नेते इमरान मसूद यांनी समाजवादी पक्षाला साथ देण्याचा निश्‍चय केला असला तर अद्याप तळ्यातमळ्यात स्थिती आहे. त्यांचे सख्खे भाऊ नोमान मसूद यांनी ‘बसप’शी घरोबा केला आहे.

राहुल गांधी यांच्या काकू मेनका गांधी आणि चुलत भाऊ वरुण गांधी हेही विरोधी पक्षांमधून सक्रिय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT