chandrapur e sakal
विदर्भ

जादूटोण्यावरून मारहाण प्रकरण : आणखी दहा जणांना अटक, गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

जिवती (जि. चंद्रपूर) : जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) गावात जादूटोण्याच्या संशयावरून गावातील (chandrapur superstition case) लोकांनी वृद्ध महिला आणि पुरुषाला चौकात बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी वृद्ध महिला व पुरुषांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी २३ जणांना अटक केली. त्यापैकी १३ जणांना सोमवारला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यातील ९ जणांची जामिनावर सुटका झाली. चार जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तपासात आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. जिवतीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी पोलिसांचे पथक तयार केले. या पथकाने रात्री दहा जणांना ताब्यात घेतले. दत्ता धोंडीराम तेलंगे (३५), भागवत गोपाळ शिंदे(३४), विठ्ठल किशन पांचाळ(३७), वैजनाथ संभाजी शिंदे(५५), विठ्ठल जगन्नाथ शिंदे(३५), किरण चंद्रमणी कराळे(२५),साहेबराव सटवाजी पौळ(३५), मनोहर परशुराम भिसे (४५), केशव श्रीहरी कांबळे (३०), दिनेश अंकुशराव सोनकांबळे (२३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गावात शांतता अबाधित राहावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांच्या वतीने समुपदेशनाचे काम सुरू आहे. गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. या क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना गावाला भेट देऊन पीडित कुटुंबीयांशी चर्चा केली.

अटकेच्या भीतीने पलायन

जादूटोण्याच्या कारणावरून मारहाण करणाऱ्यांचे अटकसत्र पोलिसांना सुरू केले आहे. आतापर्यंत 23 जणांना अटक झाली. यात प्रकरणात आणखी काही आरोपी आहे. अटकेच्या भितीने त्यांनी गाव सोडले आहे. ते लगतच्या जंगलात लपून असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केली आहे.

गावात शांतता राहावी यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र, गावात येण्यासाठी कुणालाही पोलिसांनी अडविले नाही. गावात सध्या शांततेच वातावरण आहे.
-सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलिस अधिकारी गढचांदूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT