file photo 
विदर्भ

स्थायी समितीची फटकेबाजी, भाजप सदस्यांच्या पदरात 105 कोटी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीने दोन आठवड्यांत 152 विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यातून भाजप नगरसेवकांच्या पदरात 105 कोटींचा निधी पडला. विरोधी पक्षातील सदस्यांवरही स्थायी समितीने मेहरनजर केली. परंतु, तुलनेने बोटावर मोजण्याइतपत नगरसेवकांनाच निधी मिळाला.
विधानसभा निवडणुकीचे संकेत मिळताच स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी दोन आठवड्यांत स्थायी समितीच्या तीन बैठकी घेतल्या. तिन्ही बैठकी काही मिनिटांमध्येच उरकल्या असल्या तरी 152 विकासकामांच्या प्रस्तावांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. अपेक्षेप्रमाणे बैठकीतून अनेक सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विकासाची गंगा पोहोचणार आहे. मात्र, कॉंग्रेसच्या चार तर बसपच्या केवळ दोन नगरसेवकांच्या प्रभागात विकास पोहोचणार आहे. इतर नगरसेवकांच्या पदरात मात्र निराशाच आली.
विरोधी पक्षाला 6.76 कोटी
स्थायी समितीने मंजूर केलेल्या 152 प्रस्तावांमधून विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या चार नगरसेवकांना केवळ 6.76 कोटींचा निधी वितरित केला जाणार आहे. यात विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, पुरुषोत्तम हजारे, मनोज सांगोळे यांचा समावेश आहे. इतर नगरसेवकांना मात्र निराश व्हावे लागले. त्यामुळे संपूर्ण शहराच्या विकासाचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. अनेकदा विरोधी पक्षाकडून नगरसेवकांच्या फाइल तयार केल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT