12 got poison from lunch in bhidi of wardha 
विदर्भ

शेतात रोडग्याचे जेवण करायला गेले, घरी पोहोचले अन् सुरू झाली एकच धावपळ

रूपेश खैरी

भिडी ( जि. वर्धा) : जिल्ह्यातील खर्डा येथे रोडग्याच्या जेवणातून 12 व्यक्‍तींना विषबाधा झाल्याची घटना घडली. त्यांना भिडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

खर्डा येथील काकडे यांच्या घरी पौष मासानिमित्त रोडग्याच्या स्वयंपाकाचे 30 जानेवारीला आयोजन केले होते. यानिमित्त गावातील आप्तसंबंधी आणि इतर मंडळींना जेवणासाठी आमंत्रित केले होते. रोडग्याचे जेवण केल्यानंतर काही जणांना त्रास जाणवू लगला. पोटामध्ये दुखणे, थंडी वाजणे, ताप, अशी लक्षणे जाणवली. काकडे परिवारातील काही रुग्णांनी सावंगी येथे उपचार केले, तर मंगळवारी (ता. एक) दिलीप इंगोले, ऋतुजा इंगोले, सुनीता इंगोले, रमेश इंगोले, भावेश मांढरे, विपुल खडसे, मंदा इंगोले, हर्षल इंगोले, कुंडलिक ताजणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भिडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश राठोड यांच्या मार्गदर्शनात डॉ. मून, परिचारिका पचारे व कर्मचाऱ्यांनी उपचार केले. ही विषबाधा रोडग्याच्या जेवणातून झाली की, दूषित पाण्यामुळे याचे निदान अद्यापपर्यंत लागले नाही.

रोडगे म्हणजे काय? -
रोडगे हा विदर्भातील एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तो पीठापासून तयार करून शेणाच्या गवऱ्यांची भट्टी पेटवून त्यात शिजविला जातो. साधारण पौष महिन्यात शेतामध्ये रोडग्याचा स्वयंपाक केला जातो. ज्याप्रमाणे हुर्डा पार्टी केली जाते, त्याचप्रमाणे विदर्भात रोडग्यांची पार्टी केली जाते. यावेळी आप्तसंबंधींनाही जेवायला  बोलावले जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: साखर झोपेत असताना भयंकर घडलं! ठाण्यात २५ वर्षे जुन्या सदनिकेचा काही भाग कोसळून दुर्घटना; २ जखमी

Pune Crop Insurance: पुणे जिल्ह्यात सुमारे ८३,००० शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; २३८ कोटी रुपयांचे मिळणार पीक विमा सुरक्षा कवच

‘मला वाटलं मी मरणारच…’ कॅन्सरच्या निदानानंतरची ती भयानक रात्र सांगताना मनीषा कोईराला भावुक, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे चाकण महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

पुण्यातील बुधवार पेठेत सपना बिल्डिंगमध्ये पोलिसांचा छापा... समोर जे दिसलं ते धक्कादायक, २ जणांना अटक

SCROLL FOR NEXT