Hospital Logo Google
विदर्भ

कोरोना काळातही १३ गावांमध्ये नाही रुग्णालय, प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) : जिल्ह्यातील बेंबाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे (rural hospital) काम मागील बऱ्याच दिवसांपासून कासवगतीने सुरू आहे. त्यातच येथील रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे बेंबाळ आणि परिसरातील तेरा ते चौदा गावांतील रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. कोरोनाच्या काळात या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे आवश्‍यक होते. परंतु, शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन इमारतीचे काम रेंगाळतच चालले आहे. (13 villages still waiting for hospital in mul of chandrapur)

तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेले बेंबाळ हे ग्रामपंचायतस्तरावरील मोठे गाव. गावातील लोकसंख्येचा विचार करता येथे मागील बऱ्याच वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे. लोकसंख्येची व्याप्ती वाढली. नांदगाव, घोसरी, चांदापूर, नवेगाव भू. तसेच आजूबाजूच्या तेरा खेडेगावातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असल्याने याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीला मान्यता मिळाली. शासन आणि प्रशासनाच्या मान्यतेनुसार, येथे नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. परंतु, कोरोना काळातील पहिले वर्ष निघून गेले, तरी इमारतीचे काम रेंगाळत असल्याचा आरोप होत आहे.

कोरोना बांधितांची संख्या ग्रामीण भागामध्येसुद्धा वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरातील रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले असताना अशा परिस्थितीत बेंबाळ येथील नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे आवश्‍यक होते. ग्रामीण रुग्णांसाठी ही इमारत आधार ठरली असती. परंतु, बेंबाळवासींना या इमारतीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. संबंधित कत्रांटदार, बांधकाम विभाग आणि शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. संसर्गाच्या काळात ग्रामीण रुग्णांना योग्य आरोग्य सेवेअभावी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव असून, इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पाच नंतर दवाखान्यात कुणीच उपस्थित राहत नसल्याने रात्रीच्या सुमारास रुग्णांना भरती करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना जीव धोक्‍यात घालूनच तालुक्‍याच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. बेंबाळ येथील ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत 13 ते 14 गावे समाविष्ट असून, या गावांतील जनतेला योग्य उपचाराअभावी त्रास सहन करावा लागत आहे.

बेंबाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम कत्रांटदाराच्या दुर्लक्षामुळे कासवगतीने सुरू आहे. सद्यःस्थितीतील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. त्याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण करून अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात यावे.
- पवन निलमवार, तालुकाध्यक्ष, युवक कॉंग्रेस, मूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT