विदर्भ

कोळसा तस्करीचा पर्दाफाश 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - कोळसा खाणीतून वीजनिर्मिती केंद्रात वाहून नेताना ट्रकमधून कोळसा चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा टोळीचा मुख्य सूत्रधार असून तो सध्या फरार आहे. 

अजहर शेख इनावत शेख (26) रा. इंदर कॉलनी, खदान, कन्हान, नसीम शेख रहमतुल्ला शेख (39) रा. दहेगाव, खापरखेडा, मंगेश धरमराज ठवरे (26) रा. हनुमाननगर टेकडी, कन्हान, रामबडोर द्वारकाप्रसाद चौधरी (30) रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश, रामचंद्र अंकुश मानकर (41) रा. सरस्वतीनगर, दिघोरी आणि उदय शंकर सिंग (48) रा. निवृत्तीनगर, कळमना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर रामनारायण ठाकूर रा. काटोल रोड असे फरार आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी आहेत. कोराडी व मौदा येथील विद्युत निर्मिती प्रकल्पांमध्ये वेकोलिच्या वेगवेगळ्या खाणींमधून कोळसा पुरवठा करण्यात येतो. आरोपी हे ट्रक चालकांशी संगनमत करून ट्रकमधून कोळसा चोरायचे. त्याऐवजी ट्रकमध्ये दगड भरायचे किंवा पाणी मारून ट्रकचे वजन वाढवायचे. याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वतः सापळा रचून भंडारा मार्गावरील कापसी येथील जय भोले वजन काट्याजवळील मोकळ्या जागेत साठवलेल्या कोळशावर छापा टाकला. पोलिसांनी 4 लाख रुपये किमतीचा 158 टन कोळसा जप्त केला. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. तर टोळीचा म्होरक्‍या रामनारायण ठाकूर हा फरार आहे. 

इंडोरामात कोळसा पोहोचवणारे ट्रक जप्त 
यावेळी घटनास्थळी पोलिसांनी एमएच-46, बीबी-1821 क्रमांकाचा एक ट्रक पकडला. हा ट्रक कन्हान येथील गोडेगाव कोळसा खाणीतून निघाला होता. तो ट्रक बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीत जाणे अपेक्षित होते. तर एमएच-29, टी-0221 क्रमांकाचा ट्रक गोडेगाव येथील खाणीतून नरसिंगपूर येथे जायला हवे होते. एमएच-34, एबी-2220 क्रमांकाचा ट्रक कन्हान येथील इंदर खाणीतून धरमपेठ परिसरात एका ठिकाणी पोहोचणार होते. पण, ट्रक कोळसा भरून थेट आरोपींकडे पोहोचला, अशी माहिती आहे. 

एक ट्रक कोळसा बाजारात 25 हजाराला 
अशाप्रकारे आरोपी एका दिवसात अनेक ट्रक कोळसा जमा करायचे. खुल्या बाजारात एक ट्रक कोळशाची किंमत 25 हजार रुपये इतकी आहे. आरोपी ट्रक चालकांना महिन्याला 5 ते 10 हजार रुपये देतात. त्यांच्याकडून हजारोंचा कोळसा चोरी करतात. काही स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT