17 children driver injured accident ST bus BB-Mandwa road in Lonar police hospital Sakal
विदर्भ

ST Accident News : शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात; १७ मुले आणि चालक जखमी

लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात

सकाळ वृत्तसेवा

लोणार : लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर एसटी बस व शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात होऊन १७ मुले आणि चालक जखमी झाले आहे. हा अपघात ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला. जखमींना मेहकर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

बीबी येथून एक किलोमीटर अंतरावर मांडवा रोडवर एमएच ४० एक्यू ६२५८ क्रमांकाच्या चिखली अंढेरा बुलडाणा ही एस टी बस आणि सहकार विद्या मंदिर चे विद्यार्थी शाळेत बीबी येथे घेऊन येत असणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी घडली.

गोकुळाष्टमीनिमित्त मुले विविध वेशभूषा करून सहकार विद्यामंदिरामध्ये वाहनाद्वारे जात होते. दरम्यान मांडवा गावानजीक एसटी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शाळकरी मुलांच्या वाहनाची व एसटी बसची धडक झाली.

या अपघातामध्ये ६ ते १६ वयोगटातील मुले जखमी झाली असून वाहनाचा चालकही गंभीर जखमी झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच बीबी येथील दीपक गुलमोहर यांचे मित्र, सहकारी व ग्रामस्थांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढून रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनाद्वारे बीबी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून जालना येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वाहन चालक मात्र या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला मोठ्या प्रवासानंतर वाहनातून बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बीबीचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनीही तत्काळ घटनास्थळ गाठले. बसमध्ये नऊ प्रवासी होते, असे वाहक वनारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT