गोधनी : दुधाचा व्यवसाय करून अनेक बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराचा संदेश देणारे गोधनी व अन्य गावांतील दुधविक्रेते युवक.
गोधनी : दुधाचा व्यवसाय करून अनेक बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराचा संदेश देणारे गोधनी व अन्य गावांतील दुधविक्रेते युवक. 
विदर्भ

दुधामुळे बदलला आयुष्याचा रंग

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आईवडिलांचा पैसा खर्च करून पदवी व पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेतले. नोकरीसाठी जागोजागी हातपाय मारले. परंतु, अथक प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने नैराश्‍य आले. मात्र, काही तरुणांनी निराश न होता वेळीच मार्ग बदलून दुग्ध व्यवसाय सुरू करीत, स्वत:सोबतच इतरांनाही स्वयंरोजगाराचा मार्ग दाखविला. नोकरीच्या मागे धावून आयुष्याची महत्त्वपूर्ण वर्षे वाया घालविणाऱ्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी ते आदर्श ठरलेत. उपराजधानीला लागून असलेल्या गोधनी, लोणारा, बोखारा, चक्‍की खापा, गुमथळा, भरतवाडा, बामनवाडा, बैलवाडा, गुमथी, येलतूर या गावांमध्ये एकेकाळी घरोघरी बेरोजगार तरुणांची फौज होती. बी. ए., एम. ए., डी. एड. तसेच आयटीआय करूनही नोकऱ्या लागल्या नाहीत. त्यामुळे बेरोजगार राहण्याऐवजी त्यांनी पोटापाण्यासाठी स्वत:चा पशुपालनाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी गायी-म्हशी खरेदी करून दूधविक्री सुरू केली. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांमधील तरुणांचे आयुष्य बदलले आहे. आजच्या घडीला या गावांमधून दररोज शेकडो लिटर दूध उपराजधानीत विक्रीसाठी येते. दुग्ध व्यवसायाचा लाभार्थी ठरलेला गोधनीचा अचल राऊत म्हणाला, ""मी बी. ए. झालो, पण नोकरी मिळाली नाही. त्यामुळे नाइलाजाने वडिलोपार्जित दुधाचा व्यवसाय करावा लागतो आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी या व्यवसायात आहे.'' अचलच्या वडिलांकडे जवळपास 35 म्हशी व 15 गायी आहेत. दररोज दीडशे लिटर दूध निघते. 38 रुपयांचा भाव मिळत असल्याने महिन्याला दीड ते दोन लाखांचे घसघशीत उत्पन्न मिळते. पण पशुखाद्य, मजुरी व अन्य खर्च वजा जाता फारच थोडी रक्‍कम शिल्लक राहते. त्याउपरही समाधानी असल्याची भावना त्याने व्यक्‍त केली. स्वयंरोजगाराचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते.
पशुखाद्य महाग, मजुरीही दुप्पट
पशुखाद्य महाग झाल्यामुळे व्यवसाय परवडत नसल्याची नाराजी त्यांनी बोलून दाखविली. ढेप, भुसा, मका व चुणी आदी खाद्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. मजुरीही दुप्पट झाली. राज्य शासनाकडून पशुखरेदीच्या योजनांचाही फायदा मिळत नाही. कर्जासाठी शेकडो खेटे मारून अखेर बॅंकेकडे जाणेही बंद केल्याची खंत अचल व्यक्त करतो.
जेमतेम शिक्षण झाल्याने नोकरी मिळाली नाही. घरच्यांच्या मार्गदर्शनामुळे दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारून समाजात सन्मानाने जगता येणे शक्‍य झाले.
-अश्‍विन ढेपे दूध विक्रेता, गोधनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT