2 died in two wheeler accident in wardha 
विदर्भ

काम संपवून परतीच्या प्रवासाला निघाले, गावाजवळ पोहोचले अन् सर्वच संपलं

रूपेश खैरी

वर्धा : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर एक गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास सावंगी बायपासवर घडला. मृतकांमध्ये सालोड (हि.) येथील शकील शेख (वय६०) व पंजाब धांदे (वय६५) यांचा समसावेश आहे, तर सागर परतेकी (३०) नामक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे.

माहितीनुसार शकील शेख, पंजाब धांदे व सागर परतेकी हे तिघे एमएच २९ एस १२८ क्रमांकाच्या दुचाकीने सालोडकडे जात होते. नागपूर-यवतमाळ मार्गावर सावंगी बायपास उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात शकील शेख व पंजाब धांदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सागर परतेकी गंभीररित्या जखमी झाला.

माहिती मिळताच सावंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. जखमीला सावंगी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सावंगी पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT