Falling building  Eduardo Verdugo
विदर्भ

बापरे! धारणीत दोन मजली इमारत कोसळली; नागरिकांच्या सतर्कतेने टळली जीवितहानी

सकाळ डिजिटल टीम

धारणी (जि. अमरावती) : शहरातील मुख्य चौकातील जास्त रहदारी असलेल्या मार्गावरील कोप-यावरील दोन मजली इमारत अचानक भुईसपाट झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

शहरातील चर्च परिसरातील चर्चसमोरील ङ्कारुक अब्दुल रज्जाक व मो. जावेद यांची दोन मजली इमारत आहे. आज दुपारी इमारतीत राहणा-या लोकांना काही ठिकाणी भेगा पडल्याचे दिसले, काही वेळातच इमारतीमधून आवाज येऊ लागला. त्यामुळे घरातील लोकांनी तत्काळ घरातून बाहेर पळ काढला.

सर्व लोक घरातून निघताच दोन मजली इमारत अचानक कोसळली. आपल्या डोळ्यांसमोर इमारत पडताना पाहून महिलांनी आक्रोश केला. आजूबाजूचे लोकही मदतीला धावले. यावेळी घरात ङ्कारुक अब्दुल रजाक, परवीन बानो, निदा बानो, रायमिन बानो, मो. जावेद, परवीन बानो, अङ्र्कात व जावरिया बानो होते. ते आधीच घराच्या बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

मात्र, या घटनेत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरातील कोणतेच सामान, रोकड व दागिनेही काढण्यात आले नसून शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली होती. कोसळलेल्या इमारतीच्या मलब्यातून सामान बाहेर काढण्याचे काम सुरू होते. ही इमारत अचानकपणे कशी कोसळली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT