File photo
File photo 
विदर्भ

यशोदानगरातील खूनप्रकरणात तिघांना 20 पर्यंत कोठडी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील यशोदानगरात वर्चस्व स्थापन करण्याच्या उद्देशाने झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणी अटकेतील तीनही संशयितांना जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 20) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता.16) दिले.
शनिवारी (ता. 14) रात्री भूषण अनिल बांबूर्डे (वय 20 रा. संजयगांधीनगर नं. 2) युवकाचा खून झाला होता. फ्रेजरपुरा पोलिसांनी अल्पवयीनासह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. रविवारी (ता. 15) ऋतिक सिद्धार्थ भालेकर (वय 20), विशाल धनराज गडलिंग(22), मंगेश बाबूलाल तायडे (वय 19) तिघेही रा. पंचशीलनगर. यांच्यासह एक अल्पवयीन (वय 17) अशा चौघांना अटक केली. अल्पवयीन वगळता तिघांनाही फ्रेजरपुरा पोलिसांनी सोमवारी (ता. 16) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अल्पवयीनाची रवानगी बालसुधारगृहात केली. या हल्ल्यात गंभीर जखमी भूषणचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. मृत भूषणचा भाऊ रोहन ऊर्फ रोशन अनिल बांबूर्डे (वय 26 रा. संजयगांधीनगर) याने पोलिसात तक्रार केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT