संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

शहरात 209 डेंगीग्रस्त आढळले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः नागपूर जिल्ह्यासह शहरात बदलत्या वातावरणामुळे स्क्रब टायफसपासून तर मलेरिया, स्वाइन फ्लू आणि डेंगीचा उद्रेक आलटून पालटून सुरू झाला आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डेंगीने कहर सुरू आहे. जानेवारीपासून तर आतापर्यंत शहरात 209 जणांना डेंगीची लागण झाली आहे. विशेष असे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 184 डेंगीग्रस्त असल्याचे आढळून आले.
शहरात साथीच्या आजारावर नियंत्रणाची तसेच उपचाराची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु, शहरात केवळ डेंगीच्या अळ्या शोधमोहीम सुरू आहे. प्रभावी उपचाराची यंत्रणा महापालिकेच्या आरोग्य विभागाजवळ नसल्यामुळे डेंगीचा उद्रेक दिसून येत आहे. विशेष असे की, डेंगीचा उद्रेक होत असल्याचे चित्र असल्याने खासगी रुग्णालयांनी डेंगीच्या चाचण्यांतून लूट सुरू केली आहे. महापालिका डास अळ्या सापडल्यानंतर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देत आहे.
यावर्षी 2019 सालच्या जानेवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यात 25 जणांना डेंगीचा ताप आला असल्याची माहिती पुढे आली होती. त्यावेळी यावर्षीही डेंगीचा डंख कायम असल्याचे सूतोवाच दै.सकाळने केले होते. यानंतर थेट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये डेंगीचा नागपूर शहरात उद्रेक झाल्याचे दोन्ही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते.

चिमुकल्यांना धोका
महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत काही दहा दिवसांपूर्वी 29 शाळांमध्ये डेंगीच्या अळ्या आढळून आल्या असल्याचे पुढे आले होते. यामुळे संबंधित विभागाने शाळांना नोटीस बजावून त्या स्वच्छ करण्याचे आदेश दिले. शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, यामुळे लहान मुलांना डेंगीचा सर्वाधिक धोका आहे, याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने डोळेझाक केली आहे.

ग्रामीण भागातही डेंगीची लागण
नागपूरच्या ग्रामीण भागातही 50 पेक्षा अधिक डेंगीग्रस्त आढळले असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. या भागात उपाययोजना सुरू केला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मागील वर्षी उपराजधानीत 562 डेंगीग्रस्त आढळून आले होते. यावर्षीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. डेंगीची जोखीम असताना साथ यंत्रणा सक्षम करण्याऐवजी आरोग्य विभागाअंतर्गत राजकारणात अडकला असून आरोप प्रत्योरापाच्या फैरी एकमेकांवर अधिकारी झोडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT