जप्त केलेल्या बोटी जेसीपीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या. अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय, एनआरएफच्या पथकाने उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त कारवाई मंगळवारला (ता. पाच) केली. या कारवाईमुळे वाळूचोरट्यांचे धाबे दणाणले  
विदर्भ

चिंचोली, विटाळा वाळूघाटावर 25 बोटी जप्त; एनडीआरएफ आणि महसूल विभागाची कारवाई

सायराबानो अहमद

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) ः तालुक्‍यातील वर्धा नदीच्या चिंचोली येथील वाळूघाटावर महसूल विभागाने वाळूचोरी थांबविण्यासाठी छापा टाकला. या वेळी वाळू उपस्यासाठी उपयोगात आणणाऱ्या 25 बोटी आदी मुद्देमाल सोडून वाळूचोर पळून गेले. 

जप्त केलेल्या बोटी जेसीपीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या. अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय, एनआरएफच्या पथकाने उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त कारवाई मंगळवारला (ता. पाच) केली. या कारवाईमुळे वाळूचोरट्यांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्‍यातील चिंचोली व विटाळा येथील नदीपात्रावरील वाळूघाटात पाण्याखाली वाळू आहे. या वाळूचा अवैध उपसा एका बोटीला 15 ड्रम लावून तयार करण्यात आलेल्या बोटीच्या माध्यमातून करण्यात येत होता. वर्धा नदीपात्रातून बोटीच्या साहाय्याने वाळूची चोरी सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. यामुळे अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालय, एनआरएफच्या पथकाने उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त कारवाई केली. 

प्रथम विटाळा व त्यानंतर चिंचोली येथे कारवाई करण्यात आली. या वेळी परिविक्षाधीन तहसीलदार गौरव भळगटिया, मंडळ अधिकारी प्रकाश बोमनोटे, तलाठी विनोद जायेभाये आदी सहभागी झाले होते.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT