Strict Lockdown esakal
विदर्भ

विदर्भात २५ हजार कोटींचा व्यवसाय ठप्प, तीन हजार कोटींचा महसूलही बुडाला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात वाढलेल्या कोरोनाच्या (coronavirus) प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लावण्यात आलेली आहे. यामुळे जीवनावश्यक व अत्यावश्यक क्षेत्र वगळून अन्य सर्व व्यापारांवर शासकीय आदेशांवरून निर्बंध लागू करण्यात आले. गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया हे दोन महत्त्वाचे सण टाळेबंदीत ‘लॉक' झाले. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात हा व्यापार वगळून विदर्भात अंदाजे ४० हजार कोटींचा फटका बसला. त्यात शहरातील २५ हजार कोटीचा समावेश असल्याने तीन हजार कोटींचा वस्तू व सेवा कराचा महसुलावर पाणी सोडावे लागल्याची माहिती आहे. (25 thousand crore business closed due to lockdown in vidarbha)

पहिल्या टाळेबंदीच्या काळातही जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यवसाय प्रभावित झाले होते. कोरोनामुळे दुसऱ्या लाटेतील टाळेबंदीचा थेट परिणाम राज्यासह विदर्भातील अर्थव्यवस्थेवर आणि व्यापार क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे बाजारपेठा ठप्प असून गेल्या दीड महिन्यात ४० हजार कोटींची तर शहरात २५ हजार कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ॲण्ड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, व्यापार क्षेत्र कायम असंघटित व अकुशल लोकांना रोजगार पुरवत असते. पण हे क्षेत्र अडचणीत आल्यामुळे व्यापारी त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे कर्मचारी हे प्रचंड अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर या क्षेत्राला भरीव आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली जात आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असून माल वाहतुकीचे हब आहे. याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात वेअर हाउसही असून लोखंड, कोळसा, वीज, खाण, कपडा, सराफासह इतरही व्यवसायासाठी महत्त्वाचे शहर आहे. यंदा लग्न सराई, सण आदी साजरे न झाल्याने नागपूरचे नुकसान अधिक झालेले आहे असेही अग्रवाल यांनी सांगितले.

'या' आहेत मागण्या -

  • महावितरणने विजेचे वास्तविक बिल द्यावेत.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या दुकान गाळ्यांचे तीन महिन्याचे भाडे माफ करावे.

  • इतर व्यापाऱ्यांना तीन महिन्याचा मालमत्ता कर माफ करावा.

  • भांडवल संपुष्टात आल्याने, छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या दहा टक्के इतकी रक्कम वार्षिक तीन टक्के व्याजाने कर्ज रूपाने उपलब्ध करून द्यावी.

  • सरकारने व्यापारी वर्गाचा अंत न पाहता तातडीने व्यापारास परवानगी द्यावी.

  • एसजीएसटीचा परतावा तातडीने द्यावा.

  • स्टॅम्प ड्यूटीच्या सूटला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी.

  • ई वे बिलाची मर्यादा वाढविण्यात यावी. सध्या पाच लाखांची मर्यादा आहे.

  • वस्तू व सेवा कर भरण्याच्या तारखेला मुदत वाढ देण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kognoli News : कोगनोळी टोलनाक्यावर तणाव; राजू शेट्टींच्या स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांशी बाचाबाची, पोलीस वाहने सोडत असल्याने तणाव

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Pune News : बार्टीचा कौशल्य विकास विभाग बंद पडणार?; निधी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Mumbai News : हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; अप-डाउन मार्गावरील लोकल रखडल्या, गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

Vani Crime : एका लाखाच्या बदल्यात सहा लाखांचे आमिष दाखवून पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला लुटले...; तिघांना अटक

SCROLL FOR NEXT