3 forest worker died in fire in nagzira forest in bhandara 
विदर्भ

अज्ञातानी लावलेली आग विझवित होते वनमजूर, पण आग भडकली अन् निष्पाप जीवांचा गेला बळी

अभिजित घोरमारे

भंडारा : गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्याच्या मध्यभागी नागझिरा-पितेझरी अभयारण्य आहे. येथील एनएनटीआर वनपरीक्षेत्रामध्ये अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लावली. जंगलाला लागलेली आग पाहून वनमजूर आग विझविण्यासाठी धावले. मात्र, यामधअये तीन वनजमुरांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीरित्या भाजले आहेत. त्यामुळे आता याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.

गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कक्ष क्र. ९८, ९९, १००, ९७ येथे आग लागली होती. सदर आग विझविण्याचे काम ५०-६० वन कर्मचारी, अधिकारी व हंगामी मजूर करत होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. पण दरम्यान वाऱ्याचा वेग वाढल्याने आग पुन्हा वाढली. विझविण्याचे कार्य सुरू असता कर्मचाऱ्यांना अचानक आगीने वेढले व पहाडी जागा असल्याने वणवा विझवणाऱ्यांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आणि ३ वनमजुरांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये राकेश युवराज मडावी (वय 40 वर्ष राहणार थाडेझरी), रेखचद गोपीचंद राणे (वय 45 राहणार धानोरी), सचिन अशोक श्रीरंगे (वय 27 राहणार कोसमतोंडी) यांचा समावेश आहे. तर विजय तीजाब मरस्‍कोले (वय 40 वर्ष राहणार थाडेझरी तालुका सडक अर्जुनी) व राजू शामराव सयाम (वय 30 वर्ष राहणार बोरुंदा) हे दोघे गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवलेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मरण पावलेले तिघे पहाडावर होते आणि त्यांना आगीने चहूबाजूने वेढले होते. त्यामुळे त्यांना खाली येता नाही आले. त्यांतील एक जण खाली आला त्याला आम्ही वाचवले. या घटनेनंतर आम्ही जबाबदारी झटकणार नाही. मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, त्यावर आमची चर्चा सुरू असल्याचे नवेगाव बंध नागझिराच्या उपसंचालक पूनम पाटे यांनी सांगितले.

कालच्या घटनेत तीन हंगामी मजूर मरण पावले, तर जखमी झालेल्या दोघांना आम्ही नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मरण पावलेले हंगामी मजूर असल्यामुळे शासनाकडून काही मदत मिळेल, असे वाटत नाही. पण आमच्या स्तरावर मदत कशी करता येईल, असा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक रामानुजम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT