3 people are no more in 2 different accidents in wardha district  
विदर्भ

ब्रेकिंग: समुद्रपूर तालुक्यात भीषण अपघाताच्या दोन घटना; ऐन होळीच्या दिवशी तीन जण ठार 

गजानन गारघाटे

गिरड (जि. वर्धा) :  समुद्रपूर -वायगाव गोंड  मार्गांवर दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघजण जागीच ठार झाले. तर दुचाकी चालकाचा सहकारी यात जखमी झाला आहे.दुसऱ्या अपघातात दुचाकी अनियत्रित झाल्याने एकाच मृत्यू झाला. या दोन्ही घटना आज रंगपंचमीच्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडल्या.

दुचाकीच्या समोरासमोर धडकेत प्रदीप कुंभारे रा. हिवरा आणि सतीश भोयर रा. वायगाव गोंड दोघे जागीच ठार झाले. तर लाहोरी गावाकडे जात असतांना रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी अनियत्रित होऊन भाग्यवान लोहकरे रा. लाहोरी याचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार दुचाकीने सतीश भोयर वय 40 वर्ष हा वायगाव गोंड वरून समुद्रपूरकडे येत होता. तर हिवरा येथील प्रदीप कुंभारे वय 40 आणि सहकारी शुभम बहादूरे हे दोघे एम एच 32सी झेड 2774 क्रमांकाच्या दुचाकीने समुद्रपूर वरून  अंतसंस्काराचे साहित्य खरेदी करून राळेगाव मार्ग हिवऱ्याला जातं होते. दरम्यान वायगाव गोंड रस्त्यावर श्री गायकवाड यांच्या शेताजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात सतीश भोयर आणि प्रदीप कुंभारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप कुंभारे यांचा सहकारी शुभम बहादुरे जबर जखमी झाला.

दुसऱ्या घटनेत समुद्रपूर वरून लाहोरी येथे जात असतांना रस्त्यात दुचाकी अनियत्रित झाल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजता घडली.भाग्यवान चरणदास लोहकरे वय 48 वर्ष रा. लाहोरी असे मृतकाचे नाव आहे.

चरणदास लोहकरे समुद्रपूर वरून  दुचाकीने लाहोरी येथे जात होता.. दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. दरम्यान पोलीस पाटील चंद्रकांत बहादुरे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य छत्रपाल टाकसांडे यांनी समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भाग्यवान चरनदास लोहकरे वय 48 रा लाहोरी यांनां मृत घोषित केले घटनेचा अधिक तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT