Accident News Esakal
विदर्भ

Vardha Accident News: झेंडा लावायला मंदिरावर चढले अन्.. विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

मंदिरावर झेंडा चढवत असताना विजेचा धक्का लागल्याने ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

वर्ध्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मंदिरावर झेंडा चढवत असताना विजेचा धक्का लागल्याने ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या पिपरी मेघे या गावात आज (३०, ऑगस्ट) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. अशोक सावरकर(वय 55), बाळू शेर (वय 60) आणि सुरेश झिले (वय 33) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास सर्वत्र रक्षाबंधनाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडली. विजेचा धक्का लागून ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यामध्ये घडली. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावायला तीन तरुण चढले होते. मंदिरातील झेंड्याचा खांब हा 25 फूट उंचीचा होता.

झेंडा वरती चढवत असताना झेंड्याच्या लोखंडी खांबाचा तोल सुटल्यामुळे तो शेजारी असलेल्या 33 केव्हीच्या विजेच्या तारेवरती पडला, ज्यामुळे तिघांनाही विजेचा धक्का लागला. विद्युत प्रवाहाचा जोरात झटका लागल्याने तीनही तरुण मंदिराच्या शेडवर पडले.

या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

Kolhapur Bullock Cart Race : पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार! 82 गाड्यांचा सहभाग; कोल्हापूरच्या 'सतेज-ऋतू' शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर? वाचा विजेत्यांची यादी

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

2G Ethanol Uses : शेतीतील कचऱ्यापासून तयार होणार नवे इंधन! 2G इथेनॉलमुळे शेतकऱ्यांसह कोणकोणत्या क्षेत्राला फायदा?

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

SCROLL FOR NEXT