विदर्भ

गुणपत्रिका नसल्याने ३० हजार विद्यार्थी पदवी प्रवेशापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : बारावी फेरपरीक्षा निकालाच्या गुणपत्रिका राज्यातील 30 हजार 438 विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेल्या नाहीत. यामुळे विद्यापीठांमधील पदवी प्रवेशाची अंतिम तारीख जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी लागला. या निकालात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता यावा या हेतूने जुलै महिन्यात फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात आले. फेरपरीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाद्वारे 23 ऑगस्टला लावण्यात आला. यात विभागातून 4 हजार 745 तर राज्यातून 30 हजार 438 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मात्र, अद्याप गुणपत्रिकेचे वाटप केलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण निर्माण होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवेशाची अंतिम तारीख चार सप्टेंबर आहे. या प्रमाणेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ती पाच सप्टेंबर अशी आहे. याचप्रमाणे राज्यातील बहुतांश विद्यापीठात ती सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवड्यातील तारीख आहे. त्यामुळे गुणपत्रिकाच न मिळाल्यास त्यांचे प्रवेश कसे होणार हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे विद्यार्थ्याला प्रवेश घेतल्यानंतर विद्यापीठात नोंदणी करावी लागते. त्यानंतर त्यास "एनरॉलमेंट क्रमांक' मिळतो. हा क्रमांक पदवी पूर्ण होईपर्यंत एकसारखा असल्याने त्याचे बरेच महत्त्व असते. हा क्रमांक नोंदविताना बारावी गुणपत्रिका असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे बऱ्याच महाविद्यालयांद्वारे एनरॉलमेंट क्रमांकासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सिटी प्रिमिअर कॉलेजचे संचालक डॉ. गंधे यांना विचारणा केली असता, त्यांनी "एनरॉलमेंट'ची प्रक्रिया जवळपास संपल्याचे सांगितले. 

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लावल्यावरही गुणपत्रिका केव्हा येईल, याबद्दल कुठलीच माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे गुणपत्रिका केव्हा मिळतील हे सांगता येणे शक्‍य नाही.
- रविकांत देशपांडे, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MS Dhoni च नाही तर कोलकाता नाईट रायडर्सच्या 'या' तीन खेळाडूंसाठी यंदा शेवटचं आयपीएल?

नवी मुंबई एअरपोर्टचा मोठा धमाका! ४६ नव्या शहरांसाठी उड्डाणांची घोषणा; उन्हाळी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या मार्ग...

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Narayangaon News : मोफत शस्त्रक्रियेमुळे शेतमजूर तरुण विवाहितेचे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमय

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाणारच! ड्यू प्लेसिस ते इरफान पठाण, १२ एक्सपर्टची भविष्यवाणी; तुमचे टॉप ४ कोणते?

SCROLL FOR NEXT