file photo 
विदर्भ

हावडा-मुंबई मेलमधून 33 अल्पवयीन मुलांची सुटका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रवासी, स्थानिक पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हावडा-मुंबई मेलमधून 33 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात यश आले. मुले घेऊन जाणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रथमदर्शनी हे मानवी तस्करीचे प्रकरण असल्याची शंका सुरक्षा यंत्रणांना असली तरी मुलांना शिक्षणासाठी नेत असल्याचा दावा ताब्यातील व्यक्तीने केला आहे. मोहम्मद शाकीर हुसैन (22) रा. माधोपूर, भागलपूर, बिहार असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे. नागपूरच्या दिशेने धडधडत निघालेल्या हावडा-मुंबई मेलच्या एस-5 क्रमांकाच्या डब्यात मोठ्या संख्येने मुले एकत्र बसून असल्याचे एका महिलेला आढळले. शंका आल्याने त्यांनी रायपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्याने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गाडी येण्यापूर्वीच राजनांदगाव स्थानकावर सापळा रचण्यात आला. 11.46 वाजता गाडी स्थानकावर येऊन थांबताच पोलिस आणि आरपीएफच्या पथकाने एस-5 डब्याची तपासणी केली. या डब्यात 26 अल्पवयीन मुले आढळली. त्यांच्यासोबतच शाकीरही हाती लागला. मुलांनी दिलेल्या माहितीवरून एस-2 क्रमांकाच्या डब्यातही झाडाझडती घेण्यात आली या डब्यात सात मुले आढळली. सर्व 33 मुले 8 ते 12 वर्षे वयोगटातील असून बिहार राज्यातील असल्याचे सांगण्यात येते. त्यांना चाइल्ड लाइन प्रतिनिधींच्या ताब्यात देण्यात आले.
ताबापत्राची माहिती नाही
शाकीरच्या दाव्यानुसार तो मुलांना घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील सहारानगर, नांदुरा येथे शिक्षणासाठी घेऊन जात होता. मुलांच्या ताबापत्राबाबत विचारणा केली असता त्याला कोणतीही माहिती सादर करता आली नाही, शैक्षणिक संस्थेचीही कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याने संशय अधिकच गडद झाला असून स्थानिक पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Slab : मध्यमवर्ग नाराज! करदात्यांसाठी टॅक्स स्लॅब बाबत बजेटमध्ये काय घोषणा?

Tobacco Tax Explained : सिगारेटचा झुरका होणार महाग! आजपासून मोदी सरकारकडून नवी कर प्रणाली लागू; किती द्यावा लागणार टॅक्स?

Budget 2026 Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या 10 महत्वाच्या घोषणा, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Union Budget 2026 Live : प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल बांधणार

Praful Patel Clarification : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर मोठा गोंधळ! अखेर प्रफुल पटेलांनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT