tiger  sakal
विदर्भ

Tigers in Vidarbha : विदर्भात ३५२ वाघ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत देशातील वाघांची संख्या जाहीर केली. देशात ३ हजार १६७ वाघ आहेत.

राजेश रामपूरकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत देशातील वाघांची संख्या जाहीर केली. देशात ३ हजार १६७ वाघ आहेत.

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत देशातील वाघांची संख्या जाहीर केली. देशात ३ हजार १६७ वाघ आहेत. ही संख्या देशभरात ५३ व्याघ्र प्रकल्पातील आहे. त्यानुसार राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पासह संलग्नित क्षेत्रात ३६० ते ३६५ वाघ असण्याची आकडेवारी पुढे आली आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) मध्य भारतातील भूप्रदेश व पूर्वघाटावर ११६१ वाघ असल्याचे घोषित केले आहे. २०१८ मध्ये ही आकडेवारी १०३३ होती. तेव्हा २० ते २२ टक्के वाढ होऊन राज्यात ३०२ वाघांची नोंद झाली होती. देशात सरासरी १२ ते १७ टक्के वाघांची वाढ झाल्याचा अंदाज आहे.

त्यावरून राज्यात ३६० ते ३६५ वाघ असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक २०० पेक्षा अधिक वाघ आहेत. २०२२ मध्ये झालेल्या प्रगणनेनुसार ही आकडेवारी पुढे आली आहे.

दर चार वर्षांनी वाघांसह जंगलातील तृणभक्षक आणि इतरही प्राण्यांची स्थिती काय आहे, याची माहिती घेण्यासाठी प्रगणना केली जाते. भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने २००६ मध्ये प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती. आता त्याच पद्धतीने व्याघ्र प्रगणनेची मोहीम राबविली जात आहे.

२००६ ते २०२० पर्यंत दरवर्षी राज्यात २० ते २५ टक्के वाघांची संख्या वाढलेली आहे. यंदाही वाघांची संख्या वाढली आहे. ती ३६० वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भात अंदाजे (३५९-४३३) वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात विदर्भात ३५२ वाघ असल्याची नोंद झालेली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोकण आणि जळगाव परिसरातही वाघाचे अस्तित्व आहे.

राज्य सरकारने राबविलेले सकारात्मक धोरण, वन संवर्धन आणि व्यवस्थापनामुळे राज्यात वाघांची संख्या सतत वाढत आहे. परिणामी, मानव वन्यजीव संघर्षही वाढू लागला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रथमच वाघाच्या हल्ल्यात मानवाचा मृत्यू झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हा संघर्ष सतत वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने वाघांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

वर्ष : वाघांची संख्या

२००६ - १०३

२०१० - १६८

२०१४ - १९०

२०१८ - ३१२

२०२२- ३६०-३६५

राज्यातील व्याघ्र प्रकल्प - गुणांक -

पेंच - सर्वोत्तम - आठवा क्रमांक

ताडोबा- अंधारी, मेळघाट, नवेगाव- नागझिरा, बोर - उत्तम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’ प्रसिद्ध व्हिडिओ गेम निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू; मात्र प्रस्ताव नाही– सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा!

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

SCROLL FOR NEXT