383 leprosy suspected patients found in dhamangaon railway of amravati 
विदर्भ

कोरोनासोबतच कुष्ठरोगाचेही संकट, धामणगावात तब्बल ३८३ संशयित रुग्ण

सायराबानो अहमद

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : राष्ट्रीय कुष्ठरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत धामणगाव तालुक्‍यात आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी 119 पथकांची निर्मिती करण्यात आली. या पथकाच्या माध्यमातून तालुक्‍यातील एकूण 1 लाख 5 हजार 603 नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. यात 383 संशयित कुष्ठरुग्ण, तर 415 संशयित क्षयरुग्ण आढळून आले. त्यापैकी 8 जणांवर कुष्ठरोगाचे उपचार, तर 4 जणांवर क्षयरोगाचे उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 2020-21 मध्ये विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोधमोहीम आरोग्य विभागाच्या माध्यमातून नुकतीच राबविण्यात आली.  तालुक्‍यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे सर्वेक्षण करून कुष्ठरोग व क्षयरोगांचे रुग्ण शोधून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात मोफत औषधोपचार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. सर्वेक्षणासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, कुष्ठरोग तंत्रज्ञ मनीषा चव्हाण, आरोग्य पर्यवेक्षक मनोहर डकरे, तालुका समूह संघटक प्रमोद पोहेकर, क्षयरोग विभागाचे मनीष निरगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागासाठी एकूण 338 कर्मचाऱ्यांचा समावेश असणाऱ्या 119 पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. कुष्ठरोग तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतर संशयित रुग्णांमधून कुष्ठरोग व क्षयरोग झाल्याचे निश्‍चित निदान होणार असल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्‍यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

संसर्गाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न -
कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचाराखाली आणण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधणे व त्यांनाही बहुविध औषधोपचाराखाली आणत संसर्गाची साखळी खंडित करून रोगाचा होणारा प्रसार कमी करणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Election 2026 : तामिळनाडूत 'विजय युग' सुरू, सरकार स्थापनेचा केला दावा; राहूल गांधींची साथ मिळणार ?

Pargaon Crime : विवाहित मुलीचे दुसरे लग्न लाऊन देण्याच्या उद्देशाने वडीलांनीच केले अपहरण; वडीलांसह सात आरोपींना चार तासांत अटक

ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास, वाहतूक कोलमडली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Tailoring Business : रेडिमेडच्या जमान्यात शिवणकाम व्यवसायाला नवसंजीवनी! ‘परफेक्ट फिटिंग’साठी महिलांची पसंती

SCROLL FOR NEXT