File photo
File photo 
विदर्भ

42 जणांनी सोडले मैदान

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. सात) जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघातील तब्बल 42 जणांनी माघार घेतली. एकूण 151 पैकी 42 जणांनी माघार घेतल्याने उर्वरित 109 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात 23 पात्र अर्जांपैकी रमेश गजबे, संदीप धवने, रामभाऊ गाडेकर या तीन अपक्षांनी अर्ज मागे घेतले असून, 20 उमेदवार कायम आहेत.बडनेरा मतदारसंघात 28 पात्र अर्जांपैकी प्रवीण महादेवराव सरोदे (विकास इंडिया पार्टी), राहुल लक्ष्मण मोहोड (बहुजन महा पार्टी), संजय देवरावजी महाजन (आर.पी.आय.-खोब्रागडे) व अपक्ष उमेदवार नीलेश पुरुषोत्तम येते, पुरुषोत्तम उत्तमराव भटकर, राजू बक्षी जामनेकर, शैलेश अभिमान गवई, सिद्धार्थ गोंडाणे, सैय्यद इरफान सैय्यद आमीर, संजय भोंडे यांनी (एकूण 10) अर्ज मागे घेतले असून, 18 उमेदवार कायम आहेत.
अमरावती मतदारसंघात 25 पात्र अर्जांपैकी आठवले संजय हिरामनजी (बहुजन विकास आघाडी) यांच्यासह मेहराज खान पठाण, नलिनी सचिन तायडे, राहुल माणिकराव देशमुख, अशोक पुर्णाजी टेंभरे या चार अपक्ष उमेदवारांसह एकूण पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, 20 उमेदवार कायम आहेत.
तिवसा मतदारसंघात 16 पात्र अर्जांपैकी सिंधू विलास इंगळे (बहुजन महापार्टी), भीमराव काशिराव कोरडकर (राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी), अपक्ष सुरेश मारोती उंदरे, नरेंद्र बाबूलाल कठाणे, संजय पंजाब कापडे, भारत शरद तसरे या सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, 10 उमेदवार कायम आहेत.
दर्यापूर मतदारसंघात 20 पात्र अर्जांपैकी गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, सुधाकर दत्तुजी तलवारे, ऍड. भूषण अनिल खंडारे, गजानन मोतीराम लवटे, आयेशाबानो रशीद खान, सागर ज्ञानेश्वर कलाने, दिलीप साहेबराव गवई, गोपाल रामकृष्ण चंदन, नीलेश गजानन राक्षसकर या नऊ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 11 उमेदवार कायम आहेत.
मेळघाट मतदारसंघात 10 पात्र अर्जांपैकी अशोक मारोती केदार, रवी रामू पटेल या दोन अपक्षांनी अर्ज मागे घेतले असून, 8 उमेदवार कायम आहेत.
अचलपूर मतदारसंघात 15 पात्र अर्जांपैकी अंकुश गोहाड, अक्षरा लहाने, अनुष्का बेलोरकर, गिरिधर रौराळे या चार अपक्षांनी अर्ज मागे घेतले आहेत. 11 उमेदवार कायम आहेत.
मोर्शी मतदारसंघात 14 पात्र अर्जांपैकी गिरीश कराळे, नंदकिशोर कुयटे व नंदकुमार हिंगवे या तीन अपक्षांनी अर्ज मागे घेतले आहेत. 11 उमेदवार कायम आहेत.

मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या
धामणगावरेल्वे 20 , अमरावती 20, बडनेरा 18, दर्यापूर 11, अचलपूर 11, मोर्शी 11, तिवसा 10, मेळघाट 8.

चिन्हासाठी चिठ्ठ्या
बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा, मृदुला किशोर सोनोने, शेख शफी अब्दुल हफिज आणि सूरज नारायण घरडे या चार जणांनी प्रथमपसंती एकाच चिन्हाला दिलेली होती. हे चिन्ह लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना मिळाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी चिठ्ठ्या टाकून या चिन्हाचा निर्णय घेतला. चिठ्ठीद्वारे संबंधित चिन्ह मृदुला सोनोने यांना देण्यात आले. आमदार रवी राणा गत निवडणुकीत ज्या चिन्हावर निवडून आले, ते चिन्ह त्यांना मिळाले.

पाच मतदारसंघात एकच बॅलेट युनिट
धामणगावरेल्वे, अमरावती व बडनेरा मतदारसंघात अनुक्रमे 20, 20 व 18 उमेदवार रिंगणात असल्याने या ठिकाणी दोन बॅलेट युनिट तर उर्वरित दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, तिवसा व मेळघाट मतदारसंघात 15 पेक्षा कमी उमेदवार असल्याने या मतदारसंघामध्ये एकच बॅलेट युनिट लावले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT