file photo 
विदर्भ

वर्धा जिल्ह्यातील 512 अंगणवाड्यांना शुद्ध पाणी मिळेना

रामेश्‍वर काकडे

वर्धा : केंद्रासह राज्य सरकारकडून आरोग्याच्यादृष्टीने विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी स्थानिक पातळीवर त्याची प्रभावी अमलबजावणी होताना दिसत नाही. जिल्ह्यात एकूण 1281 अंगणवाड्या असून 512 अंगणवाड्यांना आजही शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही. शिवाय 291 अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रशासनाचा चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्यांना विविध स्वरूपाच्या भौतिक सोयीसुविधा पुरविल्या जातात. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये गावागावांत त्याची अमलबजावणी होत नसल्याचे दिसते. जिल्हा परिषदेअंतर्गत 1281 मोठ्या तर 187 मिनी अंगणवाड्यांची संख्या आहे. लहान बालकांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, याशिवाय वाढते कुपोषण निर्मूलन करण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून सदर बालकांना सकस आहाराचा पुरवठा केला जातो. परंतु अनेक अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची व्यवस्था नसून बालकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील 1187 अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती असून अद्याप 94 अंगणवाड्या इमारतीविना असून समाजमंदिर, शाळा व अन्य ठिकाणी भरविल्या जातात. त्यातील भाड्याच्या इमारतीत 20, खासगी इमारतीत एक, शाळेत 36, समाज मंदिरात नऊ, ग्रामपंचायतीमध्ये पाच तर अन्य 23 ठिकाणी भरतात. याशिवाय 187 मिनी अंगणवाड्याही स्वतःची इमारत नसल्याने इतरत्र भरविल्या जातात.
स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या
तालुकानिहाय अंगणवाड्यांची संख्या

कारंजा 87 आष्टी 51, देवळी 73, आर्वी, 64, वर्धा-एक 48, वर्धा-दोन 30, हिंगणघाट 75, समुद्रपूर 49, सेलू 35.
शौचालय नसलेल्या अंगणवाड्या
कारंजा 66 आष्टी 35, देवळी 13, आर्वी 50, वर्धा-एक 23, वर्धा-दोन 34, हिंगणघाट 48, समुद्रपूर 10, सेलू 12

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा विस्तार २०० किलोमीटरवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो भवनचे उद्‍घाटन

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT