59 thousand fraud with farmer in gondpipari chandrapur
59 thousand fraud with farmer in gondpipari chandrapur 
विदर्भ

अकाऊंटवर स्पेशल ऑफर आल्याचा आला फोन अन् बळीराजाने मारला डोक्यावर हात

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर ) : तुमच्या फोन पे अकाउंटला स्पेशल ऑफर मिळाली आहे. तुम्हाला चार हजार रुपयांचे बक्षीस लागले आहे, असे सांगत अज्ञाताने एका तरुण शेतकऱ्याचे 59 हजार रुपये लुटले. झालेला प्रकार लक्षात येताच शेतकऱ्याला डोक्‍यावर हात मारल्याशिवाय पर्याय उरला नाही. रविवारी (ता. 11) गोंडपिपरी तालुक्‍यातील फुर्डी हेटी गावात घडलेल्या या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोंडपिपरी तालुक्‍यातील फुर्डी हेटी येथील शैलेश नानाजी गौरकार या युवा शेतकऱ्याला रविवारी (ता. 10) एका फोन आला. तुमचा फोन पे अकाउंटला चार हजार रुपयांचे बक्षीस लागल्याचे सांगण्यात आले. यानंतर शेतकरी जाम खुश झाला. यानंतर शेतकऱ्याला  भ्रमणध्वनीवरून तुमच्या अकांउंटमध्ये जेवढी रक्कम आहे ती आमच्याकडे पाठवा. नंतर चार हजार रुपयासह संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यानंतर गौरकारने तब्बल नवदा त्याच्या अकांउटवर खात्यात असलेले 59 हजार रुपये पाठविले अन्‌ चार हजार रुपयाच्या बक्षीसासह एकूण रक्कम येण्याची वाट बघू लागला. पण काही वेळातच भ्रमणध्वनी बंद झाला.  आपली फसवूणक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. चार हजार रुपयांच्या नादात वर्षभर मेहनत करून कमविलेली रक्कम भामट्याने लंपास केल्याचे समजताच शेतकऱ्याने डोक्‍यावर हात मारला. सोमवारी (ता. 11) या शेतकऱ्याने गोंडपिपरी पोलिसात घटनेची तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT