dead e sakal
विदर्भ

चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर : शहरालगत असलेल्या दूर्गापूर (durgapur chandrapur) येथे जनरेटरमधील गॅस गळतीमुळे (gas leak) 6 जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली असून मृतांमध्ये १० वर्ष आणि ८ वर्षाच्या बालकांचा समावेश आहे.

अजय लष्कर (२१) रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) , असे मृतांची नावे आहेत. लष्कर कुटुंब कोराडीला गेले होते. सोमवारी सर्वजण कोराडीहून दुर्गापुरातील निवासस्थानी आले. रात्री जेवण आटोपले. यादरम्यान या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे घराच्या आत असलेले जनरेटर लावून हे कुटुंब झोपले. घर बंद होते. त्यामुळे जनरेटरमधून गॅस गळती झाली. त्यात सहा जणांचा मुत्यू झाला. लष्कर कुटुंबाचे नातेवाईक शेजारी राहतात. सकाळी कुणीच उठले नसल्याचे पाहून त्यांनी दार ठोठावले. पण कुणीच दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडण्यात आले. आत सात जण पडून होते. त्यानंतर सर्वांना विश्वास झाडे हॉस्पीटलमध्ये उपारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, सहा जणांना डॉक्टरांना मृत घोषित केले आणि एकाचे प्राण सुदैवाने वाचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर नशेच्या गर्तेत, तरुणाईला ड्रग्जचा विळखा; २ महिन्यांत ८८ किलो अंमली पदार्थ जप्त, ४१ गुन्हे नोंद

स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना धक्का! 'या' दोन मालिका घेणार निरोप? वाहिनीच्या 'त्या' निर्णयानंतर चर्चेला उधाण

Photos : उत्खननात सापडली चक्क 1000 वर्षांपूर्वीची अंगठी; दुर्मिळ फोटो जगभर व्हायरल, तुम्हीही नक्की पाहा..

PM-Rahat Scheme: मोठी बातमी! रस्ता अपघातात जखमी झाल्यास रुग्णालयात ठेव भरावी लागणार नाही; सरकारकडून अपघातग्रस्तांना दिलासा

Latest Marathi News Live Update : नांदेड विमानतळावर पोलिसांनी महापौरांना आत जाण्यापासून अडवलं

SCROLL FOR NEXT