84 grams and half KG silver stole in Amravati  
विदर्भ

बाप रे बाप! साडे आठ तोळे सोनं आणि अर्धा किलो चांदी लंपास; तब्बल 3 लाख 62 हजारांची घरफोडी

संतोष ताकपिरे

अमरावती ः आजारी पतीला अकोला येथील रुग्णालयात दाखल केल्याने घरी कोणीच नव्हते. त्यामुळे चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य केले. घरामधून सोन्याचांदीचे मौल्यवान दागिने, रोकड असा एकूण तीन लाख 62 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

अंजनगावसुर्जी येथील मोहंमद राजिक मो. शरीफ (वय 40) यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. सदर व्यक्ती काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे अकोल्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पत्नी दोन लहान मुलांसह अकोल्यात आपल्या नातेवाइकाकडे गेली होती. घर बंद असल्याचे बघून त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवली. 

घरातील लोखंडी व गोदरेज कपाटे फोडून चांगलाच धुमाकूळ घातला. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी मो. राजिक यांच्या पत्नीला घरफोडीची माहिती दिली. सोन्याचा हार, मंगळसूत्र, सहा सोन्याच्या अंगठ्या, रिंग असे 84 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह मुलांच्या हातातील कडे, पैंजण, चांदीचे फूल असे अर्धा किलोच्या वर चांदीचे दागिने लंपास केले. 

घरात चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ लक्षात घेता धाडसी घरफोडीमध्ये एकापेक्षा अधिक लोकांचा सहभाग असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली. श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना घरफोडीच्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. स्थानिक गुन्हेशाखेसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मंगळवारी मो. राजिक यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून अंजनगावसुर्जी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर रेकॉर्डवरील सराईताची पोलिसांनी झडती घेतली.

माहिती असणाऱ्याची टीप

मो. राजिक यांच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीचे दागिने आहेत याची पूर्वकल्पना असणाऱ्या व्यक्तीचा या कटात सहभाग असू शकतो किंवा अशाच व्यक्तीने घरफोड्या करणाऱ्या टोळीला टीप दिल्याची शक्‍यता पोलिस पडताळून बघत आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT