dhule
dhule 
विदर्भ

पाऊस पडो ना पडो जामफळसह नऊ बंधारे भरतील : संरक्षण राज्यमंत्री

जगन्नाथ पाटील

कापडणे (ता.धुळे) :  सुलवाडे जामफळ कनोली प्रकल्प वीस वर्षे रखडलेला होता. धुळे तालुक्यातील पन्नास गावांची शेती ओलिताखाली आणि शिंदखेडा तालुक्यातील पन्नास गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. या सर्व कामांची तांत्रिक बाजूंची प्रशासकीय मान्यता करुन घेतली आहे. भविष्यात पाऊस पडो न पडो जामफळ, कनोली व इतर नऊ एमआय टँक तुडुंब भरलेले असतील. कारण त्यात तापीचे पाणी पडणार आहे ; असा आशावादही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी येथे व्यक्त केला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुतळा सुशोभिकरण कामाचा प्रारंभ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर जाहीर सभा झाली. त्यावेळी मंत्री भामरे बोलत होते. माजी सरपंच भिमराव पाटील अध्यक्षस्थानी होते. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, देवेंद्र पाटील, अॅड. राहुल पाटील, भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव दिव्या मराठे, भटू पाटील, भाऊसाहेब देसले, रवींद्र पाटील, अरुण पाटील, धनूरचे सरपंच सत्यभामा पाटील, हेंकळवाडीचे सरपंच भास्कर पाटील, अमोल पाटील, ललीत बोरसे आदी उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे  म्हणालेत, अक्कलपाड्याच्या शेवटच्या टप्यात पाचशे कोटी आणल्यानंतर पुर्ण झाला. त्यासाठी परीपुर्ण प्रयत्न केलेत. चाळीस वर्षांपासून  मनमाड इंदौर रेल्वे मार्गाचे भिजत घोंगडे होते. आता ते कामही खर्‍या अर्थाने आकारास येत आहे. जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला जात आहे. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मुंबई दिल्ली काॅरीडाॅरमुळे दहा बारा हजार कोटीचे कारखाने उभे राहतील. त्यातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. दोन महिन्यात विखरण सोलर प्रोजेक्टचेही भूमीपूजन होणार आहे.

तब्बल शंभर गावांना फायदा... 
जामफळ कनोली योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील पन्नास गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. धुळे तालुक्यातील पन्नास गावांचे शेती शिवार ओलिताखाली येणार आहे. दुष्काळी स्थिती बदलणार आहे ; असेही मंत्री भामरे यांनी सांगितले.
दरम्यान भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे यांनी गटातील विविध विकासकामांची माहिती दिली.  जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव यांनी भाजपाचा विकासाचा दृष्टीकोन स्पष्ट केला. काँग्रेशी नेत्यांवर नाव न घेता शाब्दीक आसुडही ओढलेत. भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव दिव्या मराठे यांनीही कणखर भूमिका मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT