file photo 
विदर्भ

91 अर्जांची उचल; उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सातपैकी एकाही विधानसभा मतदारसंघांत अर्ज दाखल झालेला नाही. उद्या सोमवारी (ता.30) काही उमदेवार अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे. येत्या गुरुवारी व शुक्रवारी प्रमुख उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पितृपक्ष पंधरवडा काल शनिवारी (ता.28) संपला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोर पकडणार आहे. जिल्ह्यात सात विधानसभा निवडणुकीत यंदा चांगलीच रंगत येण्याची शक्‍यता आहे. काही मतदारसंघांत उमेदवार बदलावरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. तर काही मतदारसंघांत ऐववेळी उमेदवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची चर्चा रंगत आहे. विधानसभेचे नोटीफिकेशन गेल्या 27 सप्टेंबरला जाहीर झाले. त्याच दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. चार ऑक्‍टोबरपर्यंत नामांनकन दाखल करता येणार आहे. मात्र, पहिला दिवस पितृपक्ष पंधरवड्यात येत असल्याने जिल्हाभरात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यातुलनेत तब्बल 91 अर्जांची उचल सातही विधानसभा मतदारसंघांत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, दिग्रस, केळापूर, राळेगाव, वणी व उमरखेड या सातही मतदारसंघांत निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज मोफत असल्याने अर्जांची उचल वाढली आहे. मात्र, उमेदवारी दाखल करताना सर्वसाधारण उमेदवारांना दहा हजार तर आरक्षित जागेकरिता पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. आपला अर्ज एखाद्या चुकीने बाद होऊ नये म्हणून एक-एक उमेदवार दोन किंवा चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर भर देतात. त्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. घटस्थापना झाली असून, आता निवडणुकीच्या कामाला आणखी जोर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.


दोन दिवस गडबड
अद्याप एकाही राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाही. त्यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार, याबाबत संभ्रम आहे. समाजमाध्यमावर काही पोस्ट व्हायरल झाल्या असल्या तरी त्यांचा संबंध नसल्याचे पक्षानी जाहीर केले आहे. येत्या दोन ऑक्‍टोबर सुट्टी आहे. त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारी उमेदवार निश्‍चित होण्याची दाट शक्‍यता आहे. असे झाल्यास गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT