file photo 
विदर्भ

अबब! बेंबळा धरणात 20 किलोची एकच मासोळी...मासेमारी जोमात

विवेक राऊत

चांदूर रेल्वे (जि. अमरावती) : मासेमारी ही अन्नपुरवठ्याच्या दृष्टीने जीवनावश्‍यक बाब आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्यांसाठी खवय्यांची विशेष मागणी असते. अशातच चांदूर रेल्वे तालुक्‍यातील येरड (बाजार) येथे बेंबळा नदीच्या धरणातून तब्बल 20-20 किलोंच्या जवळपास मासोळ्या मच्छीमारांच्या जाळ्यात येत आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही मासेमारीचा व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरू असल्याचे दिसत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांच्या कडक लॉकडाउनमध्ये अनेक व्यवसाय मंदावले होते. त्यात मच्छिमारीच्या व्यवसायाचासुद्धा समावेश होता. लॉकडाउनमध्ये मासोळीची मागणी कमी होती. आता लॉकडाउन शिथिल होत असताना व हॉटेलसुद्धा सुरू झाल्यामुळे मासोळ्यांची मागणीही वाढत आहे.

पावसाळा सुरू झाला असताना चांदूर रेल्वे तालुक्‍यातील येरड येथील बेंबळा नदीवरील धरणाला चांगले पाणी आले आहे. अशातच या नदीतील मासोळी पकडण्यासाठी कंत्राट देण्यात येतो. बेंबळा नदीचे कंत्राट एका कंत्राटदाराला मिळाल्याने या कंत्राटदाराकडून येरड येथील मच्छीमार मासोळ्या पकडतात. यामध्ये मच्छीमारांना प्रतिकिलोप्रमाणे मासे पकडण्याचे पैसे मिळतात.

इतर जिल्ह्यात होते निर्यात

गेल्या काही दिवसांपासून या नदीतून मोठेमोठ्या मासोळी मच्छीमारांच्या जाळ्यात लागत आहेत. तब्बल 20 किलोंची एकच मासोळी मिळत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांचीही गर्दी वाढली आहे. या ठिकाणाहून नांदगाव खंडेश्वर तालुक्‍यात तसेच यवतमाळ जिल्ह्यात मासे पुरवठा होतो.


आर्थिक व्यवहार व्यवस्थित
मी मच्छीमार असून माझ्या घरचा प्रपंच याच भरवशावर चालतो. येरड येथील धरण मासेमारीकरिता ठेकेदारीमध्ये गेल्याने आम्ही त्यांच्या अंतर्गत काम करतो. आम्हाला प्रतिकिलोप्रमाणे पकडण्याचे भाव मिळत असले; तरी घरचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालतात.
- सुधाकर मानकर, मच्छीमार, येरड.

(संपादन : दुलिराम रहांगडाले) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT