Successful Rescue of Leopard Fallen into Well in Kannad Taluka | Chhatrapati Sambhajinagar News

 

Sakal

विदर्भ

आडगाव (जे) शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका; वन विभागाच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान

पिंजऱ्याच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढत केली पशुवैद्यकीय तपासणी; नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्तता

सकाळ वृतसेवा

कन्नड : तालुक्यातील आडगाव (जे) शिवारातील गट क्रमांक ६१ मधील ज्ञानेश्वर निकम यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याची वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित सुटका केली. शनिवारी (ता. १०) सकाळी साडेनऊच्या सुमारास याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वन विभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याला जीवदान मिळाले.

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक वनविभागाचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने आणि सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.

वनपाल संजय कादी, वनसेवक अशोक आव्हाड, देविदास राठोड, शेख मकसूद सईद, वाहनचालक भाऊसाहेब वाघ, सुरेश राठोड तसेच संरक्षण मजूर रामेश्वर राठोड आणि लक्ष्मण सावंत यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.

या मोहिमेत लक्ष्मण निकम, गणेश शिंदे, उपसरपंच राहुल सोनवणे, योगेश शिंदे, सोपान निकम, भावेश शिंदे, कल्याण गायकवाड, विशाल बहिरव, रवि सोनवणे, जनार्दन झिमन आणि किशोर बहिरव यांनी सहकार्य केले.

विहिरींना कठडे बांधण्याचे आवाहन

शेतातील विहिरींना संरक्षक कठडे बांधावेत. वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून बचावकार्य न करता वन विभागाला तातडीने माहिती द्यावी. सुरक्षित अंतर राखून बचाव पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेत अडकला दिवाळीचा बोनस; निवडणूक आयोगाच्या परवानगीसाठी प्रयत्न

तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदी सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

Marathi News Live Updates : तुषार गांधी यांना अटक, आदित्य ठाकरे, संजय राऊत DN नगर पोलीस ठाण्यात

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT