file photo 
विदर्भ

तरुणाईत जग बदलण्याची क्षमता : मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जगाला आवश्‍यक असणाऱ्या सर्व क्षमतांची उपलब्धता चंद्रपूर जिल्ह्याच्या तरुणाईमध्ये आहे. कोळशाच्या खाणींच्या या शहरात जग बदलण्याची क्षमता असणारे कोहिनूर उपलब्ध आहेत. याची मला वारंवार खात्री पटली असून कला, क्रीडा, विज्ञान, संशोधन या क्षेत्रातही चंद्रपूर जगाचे नेतृत्व करील, असा आशावाद राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला.
स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहामध्ये आयोजित चंद्रपूर जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धेचे उद्‌घाटन पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते आज चंद्रपूरमध्ये झाले. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्व क्षेत्रातील प्रगतीच्या क्षमतेचा आलेख मांडला. ज्यांनी कधी विमान बघितले नव्हते त्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी विमानाच्या उंचीएवढे एव्हरेस्ट सर केले, मिशन सेवा अंतर्गत जिल्ह्यामध्ये उपक्रम राबविला जात असतानाच आयआयटी स्पर्धा पूर्व परीक्षांमध्ये देशातून प्रथम येण्याचा बहुमान बल्लारपूरच्या मुलाने मिळविला, मिशन शक्ती साठी जिल्हाभरातील क्रीडांगणावर मुले सराव करत आहेत. इथल्या युवकांमध्ये प्रचंड शक्ती असून या ऊर्जेला डॉ. भटकर यांच्या सारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यास निश्‍चितच मुले जगाचे नेतृत्व करतील असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनातून आपल्याला विश्वगुरू करण्यापासून कोणीही अडथळा आणू शकत नाही. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक पुढे येणे गरजेचे असून संशोधन वृत्ती बाळगणे आवश्‍यक आहे.
पद्मभूषण डॉ. विजय भटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT