Amravati Crime  sakal
विदर्भ

Amravati Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आईचा आरोप , कथित बाबा आश्रमातून पसार

पोलिस आयुक्तालयातील वलगाव ठाण्याच्या हद्दीत पित्याची भेट घेण्याकरिता आश्रमात गेल्यानंतर कथित बाबाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, असा आरोप पीडितेच्या आईने केला. शुक्रवारी (ता. २४) सदर महिलेने यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पोलिस आयुक्तालयातील वलगाव ठाण्याच्या हद्दीत पित्याची भेट घेण्याकरिता आश्रमात गेल्यानंतर कथित बाबाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, असा आरोप पीडितेच्या आईने केला. शुक्रवारी (ता. २४) सदर महिलेने यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. अद्याप कथित बाबाला अटक झाली नाही. वलगाव पोलिसांनी याप्रकरणात बुधवारी (ता. २२) अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. असे वलगावचे पोलिस निरीक्षक वैभव पानसरे यांनी सांगितले.

रोहित मनोज ढोके ऊर्फ रोहित बाबा (वय २२) याचा नजीकच्या एका गावात आश्रम आहे. पोलिसांनी घटनेनंतर झाडाझडती घेतली असता, अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला कथित बाबा पसार असल्याचे निदर्शनात आले. पीडित मुलीच्या वडिलांनी या आश्रमात आश्रय घेतला होता. त्यामुळे वडीलांसंदर्भात माहिती घेण्यासाठी पीडित मुलगी आपल्या आईसह सदर बाबाच्या आश्रमात गेली होती.

आश्रमातील झोपडीत बाबाजवळ पीडित बसली असता, बाबाने पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने पत्रकार परिषदेत केला. पीडित मुलीने घटनेची माहिती आपल्या आईला दिली. आईने पोलिस नियंत्रण कक्षासह, ११२ क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. आपली पोलिस तक्रार झाल्याचे कळताच कथित बाबा आश्रम परिसरातून पसार झाला होता. त्यामुळे मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या बाबाला तातडीने अटक करावी, अशी मागणी पीडितेच्या आईने पत्रकार परिषदेत केली.

सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, संशयित रोहित बाबा यास लवकरच अटक केल्या जाईल.

- वैभव पानसरे, पोलिस निरीक्षक, वलगाव ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT