Abuse of a minor girl
Abuse of a minor girl sakal
विदर्भ

वर्धा : अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आला. तर दोन ठिकाणी शाळकरी अल्पवयीन मुलींना युवकांनी फुस लावून पळील्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इंझापूर येथील एका हॉटेलात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन सावंगी पोलिसात आकाश राजू पूराम (वय २१) रा. चितोडा याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, आकाश पूराम याने बोरगाव (मेघे) येथील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या भूलथापा देत फूस लाऊन पळवित नजीकच्या इंझापूर येथील एका हॉटेलात घेऊन गेला. तेथे तिच्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आला. या घटनेची चुनूक मुलीच्या आईला लागताच त्यानी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली.

अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळविले

वर्धा : फोनवर बोलत असल्याच्या कारणावरुन वडिलांनी १६ वर्षीय मुलीला हटकले. मुलीने शाळेचे महत्त्वाचे कागदपत्र सोबत घेत घरुन पळ काढला. ही घटना देवळी पोलिस ठाण्यात येणाऱ्या सिरसगाव (धनाडे) या गावात घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी मोबाईवर वडिलांना बोलत दिसली. त्यांना संशय आल्याने हटकले असता दमदाटी केली. मुलीने वडील बाहेर गेल्याची संधी साधत शाळेचे कागदपत्र घेऊन कुणालाही न सांगता घरून निघून गेली. मुलीचा शोध घेऊनही मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने फूस लाऊन पळवून नेल्याचा संशय आल्याने देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

शाळेत गेलेली मुलगी घरी आलीच नाही

आर्वी : शाळेतून येत पर्यंत घरीच राहा असे सांगून शाळेला निघून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही. ही घटना तालुक्यातील देऊरवाडा येथे घडली. या प्रकरणी पीडित मुलिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन गावातील विकास तांबे (वय २१) याच्या विरुद्ध आर्वी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहाव्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे शाळेतगेली जाताना वडिलांना मी येतपर्यंत घरीच राहा असे सांगून निघून गेली. वडील शेतातून मजूरी करून परत आले तेव्हा त्याना मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी शाळेत चौकशी केली असता शाळेत मुलगी आलीच नसल्याचे सांगण्यात आले. मुलगी गावातील विकास तांबे याच्याशी बोलताना दिसून आल्याने त्यांनी मुलीला हटकले होते. त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याच्या घरी शोध घेतला असता तोही घरी मिळून आला नाही. त्याने मुलिला फूस लावून पळविले असल्याचा संशय बळावल्याने त्याच्या विरुद्ध आर्वी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar MI vs LSG : हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्जुन झाला रिटायर्ड हर्ट, षटकही नाही केलं पूर्ण

MI vs LSG Live Score IPL 2024 : दमदार सुरूवातीनंतर मुंबईला हादरे; रोहितही झाला बाद

Raj Thackeray: ओवैसीसारख्यांचे अड्डे उध्वस्त करा; राज ठाकरेंचं महायुतीच्या जाहीर सभेत मोदींना साकडं

Lok Sabha Election 2024 : धुळ्यात भाजपचा गड कोसळणार? जाणून घ्या कसं असेल विजयाचं गणित

Climate Change On Malaria :  मलेरिया डासांच्या वाढीवर क्लायमेट चेंजचा थेट परिणाम होतोय, WHO ने दिला धोक्याचा इशारा

SCROLL FOR NEXT