Indian-army.jpg 
विदर्भ

सैनिकांच्या नावाचा अकोल्यात गैरवापर; कागदपत्रेही बनावट

भगवान वानखेडे

अकोला : ‘माझी पोस्टींग जम्मू-श्रीनगरला आहे. मला वाहन/ मोबाईल विकायचे आहे. विक्रीसाठी काढलेले वाहन केवळ आणि केवळ तुमच्यासाठी ऐवढ्या कमी किंमतीत देत आहोत’ अशी बतावणी करून सैनिकांच्या नावाचे फेक कागदपत्रे बनवून जुन्या वाहनाच्या विक्रीचा गोरखधंदा चालवित असल्याची माहिती सायबर पोलिस ठाण्यात मागील वर्षांत दाखल झालेल्या तक्रारीतून पुढे आली आहे. अशी फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार ओएलएक्स आणि क्वीकर या ॲप्सचा आधार घेत असल्याने आता पुन्हा सजग राहण्याची वेळ आली आहे.

सेकंड हॅंड वाहने आणि मोबाईल फोन विक्रीसाठी ओएलएक्स आणि क्वीकर यासारखी अनेक ॲप्स कार्यरत आहेत. सायबर गुन्हेगारांनी या ॲप्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचा गोरखधंदा सुरू केला आहे. विशेष म्हणजे हे करत असताना सायबर गुन्हेगार विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या नावाची फेक कागपत्रे तयार करीत आहेत. येथील सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका तक्रारीत तर सैन्य दलात कार्यरत असल्याचे खोटे कागदपत्रे तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

अशी करतात तुमची फसवणूक
ऑनलाईन फ्रॉड करणारे सायबर गुन्हेगार एका विशिष्ट व्यक्तीच्या नावाचे फेक आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनाचे आरसी बुक तयार करतात. चार लाखापर्यंत किंमत असलेल्या वाहनाना फोटो काढून हे वाहन केवळ दीडच लाखात विकत असल्याचे आमिष दाखवतात. यासाठी मागविण्यात येणारे पैसे हे क्वचितच अकाऊंट नंबरद्वारे तर जास्तीत जास्त पे-टीएम किंवा फोन पे ने मागविले जातात. आमिष दाखविण्यासाठी वापरण्यात आलेल्या रकमेतील ५७ टक्के रक्कम पाठविणे झाल्यावरही वाहन संबंधीत व्यक्तीला न देता त्याला वेगवेगळे कारणे देत इकडून तिकडे फिलवले जाते.

याकडे लक्ष द्या
जाहीरात पाहल्यानंतर त्याची शहनिशा करा, जाहीरात टाकणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटा, आपल्याच परिसरातील वस्तूची मागणी करा, ऑनलाईन कागदपत्रे पाठवू नका, ऑनलाईन पेमेंट करू नका असा सल्ला सायबर विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT