mines Accident 
विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या गोवरी खाणीत अपघात; चार गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

राजुरा : (जि. चंद्रपूर) : वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी कोळसा खाणीत आज दि.१६ एप्रिल ला सकाळी नऊ वाजता डम्परची तपासणी सुरू असताना अचानक एका डम्परने समोरच असलेल्या कामगारांच्या हजेरी घराला जोरदार धडक दिली. यात दोन अधिकारी व दोन कामगार जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

आज शुक्रवारी सकाळी खाणीचे काम सुरू होण्याच्या वेळी डम्पर चेक करण्याचे काम मुसळे हे फिटर करीत होते. त्यावेळी अचानक डम्पर ओव्हर रेस होऊन तो येथील लोखंडी खांबाला धडक देत आर.सी.ऑफिसात घुसली.

हेही वाचा - "मामा, अपने को कूछ नही होता बे"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र

या अपघातात गोवरी एक्सपांशन ओपनकास्ट माईनचे सहाय्यक व्यवस्थापक कौशलेंद्र प्रसाद व मनीष साखरे हे दोन अधिकारी जयप्रकाश महतो, ओवरमन जयप्रकाश महतो, लिपीक प्रभाकर चन्ने हे चार जण जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना ताबडतोब वेकोलिच्या क्षेत्रीय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. यापैकी गंभीर जखमी झाल्याने दोघांना नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT