bha24 
विदर्भ

रस्ता झाला चिखलमय, पथदिवेही नाहीत! नगरसेवकांचे दुर्लक्ष

दीपक फुलबांधे

भंडारा : शहरातील मेंढा परिसरात समतानगर फेजटू ही वसाहत आहे. परंतु, या वसाहतीमध्ये पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी व चिखल साचलेला असतो. अशा खड्डेमय रस्त्यावरून नागरिकांना रहदारी करावी लागते. त्यामुळे अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे.

समतानगर फेजटू या वसाहतीत शेकडो घरे व अर्पाटमेंट आहेत. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना रहदारी करण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा लागतो. 10 ते 15 वर्षे उलटूनही नगरपालिकेने या भागात पक्के रस्ते तयार केलेले नाहीत.

या भागातील नगरसेवकसुद्धा रस्त्याच्या बांधकामाकडे दूर्लक्ष करीत असल्याचे दिसते. पावसाळ्यात माती व मुरूम टाकलेल्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होऊन जाते. ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून चिखल होतो. अशा रस्त्यावरून रहदारी करताना कित्येक वेळा एखादे वाहन गेल्यास अंगावर चिखल उडणे, वाहन घसरून पडणे यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने जाणे दूर साधे पायी चालणाऱ्या लोकांना नीट चालता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या वसाहतीमधील नागरिक सिमेंट रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी करीत आहेत. परंतु, त्यांना फक्त आश्‍वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. या भागात झाडी, झुडपे व गवत वाढले असल्याने साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय असते. पथदिव्यांचा प्रकाश पुरेसा नसल्याने अंधार पसरला असतो. रात्रीच्यावेळी रहदारी करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. दोन नगरसेवक या भागाचे प्रतिनिधित्व करतात. परंतु, त्यांना येथील नागरिकांच्या समस्यांशी काहीएक देणेघेणे नसल्याची ओरड नागरिक करीत आहेत.

सविस्तर वाचा -  विचित्र अपघात! तीन ट्रकला उडवून तो ट्रक धडकला पेट्रोल पंपावर आणि...

नाल्यावरील पुलाचे काम अर्धवट
शहरातील प्रमुख नाला या वसाहतीमधून जातो. या नाल्याचे खोलीकरण करुन सिमेंटीकरण करण्यात आले. या वसाहतीला लागून गोसावी समाधी मंदिर ते चांदणी चौक हा जुनाच रस्ता आहे. हा रस्ता छेदून जाणाऱ्या नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. दोन महिन्यापूर्वीच जुना पूल तोडण्यात आला. परंतु, नवीन पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण करणेचे सोडून नाल्याच्या काठावर पाळ बांधण्याचे काम आधी होत आहे. हा मार्ग मेंढा, सिंधी कॉलनी व रिंगरोडकडे जातो. या भागातील नागरिक तसेच शेतकरी याच मार्गाचा वापर करतात. दरम्यान पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: नागपुरात विजांचा कडकडाटसह पावसाला सुरूवात...

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT