Accident News  esakal
विदर्भ

Accident News : बर्थडे सेलिब्रेशनाला जाताना मृत्युने मैत्रिणीला रस्त्यातच गाठलं

सकाळ वृत्तसेवा

पथ्रोट : वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात सायंकाळी तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. अपघाताची घटना परसापूर येथील ठोकबर्डा फाट्यावर बुधवारी (ता.२४) दुपारी १२ वाजेदरम्यान घडली.

वैष्णवी अर्जुन मस्करे (वय १७, रा. तेलंखडी, पथ्रोट), असे अपघातातील मृत तरुणीचे नाव आहे. येथील प्रेरणा संतोष लिल्हरे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्केश चक्रधर राऊत, प्रेरणा संतोष लिल्हरे (दोघे रा. तेलंखडी) व राजवीर गुलीचंद वर्मा (रा. नागपूर) हे एमएच २७ एएम १८१४ क्रमांकाच्या दुचाकीने, तर दुसऱ्या दुचाकीने पीयूष संतोष लिल्हरे, वैष्णवी अर्जुन मस्करे (दोघे रा. तेलंखडी), हिना गुलीचंद वर्मा असे सहाजण प्रेरणा हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चिखलदऱ्याला जात होते.

ठोकबर्डा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ०२ एव्ही ९८१ क्रमांकाची कार व पीयूषच्या दुचाकीची धडक झाली. त्यात मागे बसलेली वैष्णवी मस्करेच्या डोक्यावरून मागील चाक गेल्याने गंभीर दुखापत झाली. तिला परतवाडा येथील खासगी रुग्णालयातून अमरावती येथे हलवीत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

पथ्रोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदर अपघाताच्या घटनेनंतर तेलंखडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT