विदर्भ

Accident News : समृद्धीवर विचित्र अपघात! चालत्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठीमागून धडक; धडकेत...

सकाळ वृत्तसेवा

कारंजा : नागपूर वरून पुणे जाण्यासाठी निघालेली पर्पल ट्रॅव्हल्स बसने समृद्धी महामार्ग लोकेशन 164 जवळ चालत्या ट्रकला मागून धडक दिल्याने 12 जण गंभीर जखमी झाले. उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झाले. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घडली.

अपघाताची माहिती तात्काळ 108 समृद्धी लोकेशन कारंजा डॉक्टर गणेश व पायलट, आशिष चव्हाण 108 समृद्धी लोकेशन शेलुबाजार डॉक्टर सचिन आटोळे व पायलट प्रमोद ठाकरे 108 समृद्धी लोकेशन शिवनी व श्री गुरमंदिर रुग्णवाहिका सेवाचे रुग्णक्षेवक रमेश देशमुख हे सर्व रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अपघात ग्रस्त रुग्णाना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. तो अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स चा चालक हा टँकर आणि ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये अडकून होता.

समृद्धी अग्निशामक दल व 108 पायलट यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते. तब्बल अर्धा ते पाऊण तास तो ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये अडकून पडलेला होता. त्यावेळी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी त्याला काढण्यासाठी प्रयत्न केले. अत्यंत विचित्र अपघात झाल्यामुळे ट्रॅव्हल्स मधले काही प्रवासी वरच्या बर्थ वरून खालच्या बर्थ वर पडले. त्यामुळे बऱ्याच रुग्णाचे पाय व हात फॅक्चर झाले होते.

त्यावेळी प्रामुख्याने कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय वानखडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश नागरीकर पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक राऊत व अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनची व्हॅन कारंजा शहर ग्रामीण प्रामुख्याने मदतीसाठी हजर होते. तसेच समृद्धी एम एस सुरक्षा कवच व समृद्धी अग्निशामक दल हे सुद्धा हजर होते. सर्व रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले.

तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण ब्रदर अंकुश धाये कक्ष सेवक सचिन हनवते मास्को सिक्युरिटी गार्ड सागर खंडारे महेश विभूते . श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख समृद्धी रुग्णवाहिकचे श्याम घोडेस्वार अजय घोडेस्वार श्री जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भेलांडे वेदांत रुग्णवाहिकेचे शंकर रामटेके नवनिर्माण रुग्णवाहिकेचे विनोद खोड शुभम खोंड रुग्णसेवक सौरव राजे यावेळी त्यांनी मदत केली.

या अपघातात हर्षल रामदास पाटील (वय 41) योगिता गणेश भुते (वय 47) कुणाल सुनील भोजने (वय 20) अश्विन विलास मोरकर (वय 24) मोनाली गाडेकर (वय 42) राकेश बुते (वय 38) सायली धाडवे (वय 42) नवनाथ मोहिते (वय 42) अभिषेक वानखडे (वय 40) मंजू योगेश बुते (वय 40) वैष्णवी काळे (वय 24) सुमित सावितकर (वय 45 सर्व राहणार नागपूर हे जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT