Accident esakal
विदर्भ

ट्रॅक्टर खाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू; ऊस खाणे जीवावर बेतले

ऊसाची वाहतूक करणार्‍या चालत्या ट्रॅक्टर मधून उस काढत असताना तोल गेला.

सकाळ वृत्तसेवा

लाखनी : ऊसाची वाहतूक करणार्‍या चालत्या ट्रॅक्टर (Tractor) मधून उस काढत असताना तोल गेल्याने ट्रॅक्टर ट्राली च्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना मंगळवारी ( ता. २८) दुपारी २ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कुमार पेट्रोल पंपासमोर घडली. ईश्वर टीकाराम मेश्राम (वय १२ ) रा. सावरी/मुरमाडी असे अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो जि. प. गांधी विद्यालयातील इयत्ता ७ व्या वर्गात शिकत होता.

सध्या उस तोडणीचा हंगाम सुरू असून तालुक्यातील उस बाबदेव (मौदा) येथील साखर कारखान्यात पुरवठा केला जातो त्यामुळे ट्रॅक्टर च्या २ ट्रालीच्या सहाय्याने वाहतूक केली जाते. शहरातील जि. प. गांधी विद्यालय दुपार पाळीत सुरू असल्याने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शाळेची मध्यान्ह भोजनाची सुट्टी झाल्याने विद्यार्थी बाहेर होते. शाळा महामार्गाच्या बाजूला असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्याने केली जाणारी वाहतूक दिसत असते.

तसेच सध्या शेतातील उस निघल्याने त्या ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. उस खाण्याचा मोह ईश्वर ला झाल्याने चालत्या ट्रॅक्टरच्या ट्राली मधून उस खिचून काढत असताना तोल गेल्याने तो खाली पडून ट्रालीच्या चाकात आला. त्यात त्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाल्याने तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती घटना स्थाळावर पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच पोलिस चमू घटना स्थळी पोहचली.

वाहतूक पोलिस नायक लोकेश ढोक यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह उचलून उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत लाखनी पोलिसांकडून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विद्यार्थ्याचा अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT