Accident to laborers vehicle in tembrusoda ghat chokhaldara Amravati 
विदर्भ

मजूराच्या क्रूझर गाडीला अपघात

एकाचा मृत्यू,तीस जण गंभीर जखमी

मोहन गायन

जामली, (अमरावती) - चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रूसोडा घाटात मजुरांनी भरलेल्या क्रूझर गाडीला MH 27- AC 0357 अपघात झाला असून यात कुलंगना येथील सुरेश जामुनकर वय 22 वर्ष यांचा जाग्यावरच गाडी खाली दबून मृत्यू झाला. 30 मजूर गंभीर जखमी असून अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून मेळघाटातील मजुर प्लेन पट्ट्यात शेतातील पीक निंदण्याचा हंगाम सुरू आहे व मेळघाटात पाहिजे त्या प्रमाणात काम नसल्यामुळे सर्व मजूर अंजनगाव तालुक्यातील वागडोह,जणुना, धाडी, पथ्रोट भागात कामाला जात असतातअसे असले तरी मेळघाटातील मजुरांची वाहतूक गाड्यांने केली जात आहे एका गाडीवर क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे क्रूझर गाडीवर 30 ते 35 मजूर गाडीत खाली वर भरून वाहतूक दररोज केल्या जात असून याकडे चिखलदरा पोलीसांचे दुर्लक्ष आहे त्यामुळेच हा अपघात घडण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

पोलिसांच्या दुर्लक्षाने आदिवासी मजुरांचा बळी

या अगोदर सकाळ ने वेळोवेळी अवैध वाहतूकी बाबत बातम्या प्रकाशित केली असतांना पोलीस प्रशासन मात्र हेतुपूरस्पर दुर्लक्ष केल्या जात होतं त्याचाच परिणाम म्हणून आज एका आदिवासी युवकाचा बळी गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT