इकबाल किफायद शेख  sakal
विदर्भ

भावाचा अपघाती मृत्यू तर बहीनीने भावाच्या निधनाच्या धक्याने सोडले प्राण

घटनेने समाजमन झाले सुन्न

मोहन सुरकार

सिंदी रेल्वे : शहरातील तरुनाचा नागपुरवरुन येतांना मंगळवारी( ता. २३) ला वर्धा-नागपुर रोडवर रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. तर भावाच्या निधनाचे वृत्त कळताच धक्याने आजारी असलेल्या बहीनीने बुधवारी (ता.२४) ला प्राण सोडल्याने शहरात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत असे की शहरातील बड्डी मजीद परिसरात राहणारा इकबाल किफायद शेख (वय ३५ वर्षे) हा नागपूर येथील विदर्भ टाईल्स येथे मार्केटिंग मॅनेजर पदावर मागील काही वर्षांपासून काम करीत होता. मंगळवारी (ता.२३) ला नेहमीप्रमाणे नागपुरवरुन आपल्या पल्सर गाडी क्रमांक एमएच ४९ एसडी २४७६ ने सिंदी रेल्वे येथे रात्री ७ वाजता दरम्यान परत येत होता. धवलपेठ पुला अगोदर अज्ञात वाहनाने इक्बालच्या गाडीला जबरधडक दिल्याने डोक्याला मार लागुन त्याचा जागीच मृत्यू झाला.

हि बातमी शहरात येवुन धडकताच सर्वत्र शोककळा पसरली. मात्र भावाच्या अशा आकस्मिक अकाली मृत्यूने आजारी बहीनीला चांगलाच धक्का बसला आणि लागलीच आज बुधवारी (ता.२४) ला बहीन परविन किफायद शेख (वय ४० वर्षे) हिने घरीच प्राण सोडला हे वृत शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील शेख परिवारात दोन भावंडे, एक बहीन आणि एक म्हातारी आई असा परिवार होता. एकाचवेळी घरातील कर्त्या मुलाचे असे अपघाती निधन होने आणि याचे दुःख न झेपल्याने बहीनीचे पण लगेच निधन होणे या घटनेने समाजमन सुन्न झाले असुन सर्वाना चटका लावुन गेले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT