दारोडा : गावातल्या तरुणीला पेटविल्याच्या निषेधार्थ घटनेच्या दिवशी गावकऱ्यांनी काढलेला मोर्चा.  
विदर्भ

"त्या' आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी; दारोड्यात स्मशानशांतता

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : दारोडा हे गाव राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाटपासून 15 किमी अंतरावर असून गावाची लोकसंख्या दोन हजारांवर आहे. आतापर्यंत कोणत्याही चर्चेत नसलेले हे गाव सोमवारच्या घटनेने मात्र चर्चेत आले. परंतु, अशाप्रकारे गावाचे नाव होणे, येथील गावकऱ्यांना रुचलेले नाही.

एखाद्या चांगल्या कामासाठी नाव झाले असते, तर आम्हाला निश्‍चितच आवडले असते, अशी भावना गावकरी व्यक्त करतात. ही घटना घडल्यानंतर जेव्हा बातमी गावात पोहोचली, तेव्हा गाव अक्षरशः हादरले. रात्री गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला व गावात फिरून घटनेचा निषेध नोंदविला.

आरोपीचे कुटुंब दहशतीत

या घटनेने आरोपी विक्कीचे कुटुंबही हादरले असून ते सध्या दहशतीत आहेत. घरातील सदस्य घराबाहेर पडतानाही भीतीच्या वातावरणात पडत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आरोपी विकेशचे वडील ज्ञानेश्वर नगराळे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. एका मुलीचे लग्न झाले आहे. लहान मुलगी अविवाहित असून ती बाहेरगावला नर्स म्हणून कार्यरत आहे.

आरोपीचे वडील हृदयरोगी

ज्ञानेश्वर हे हृदयरोगी असल्याने त्यांच्या पत्नीलाच संसाराचा गाडा सांभाळावा लागतो. विकेश बारावीनंतर आयटीआयचे प्रशिक्षण घेऊन नुकताच रेल्वेत कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाला होता. विकेशचा मागील वर्षीच विवाह झाला असून, बारा दिवसांपूर्वीच त्याला मुलगी झाली आहे.

आरोपीला पोलिस कोठडी

या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला मंगळवारी हिंगणघाट येथील न्यायालयात सादर करण्यात आले होते. यावेळी न्यायदंडाधिकारी आर. व्ही. डफरे यांनी त्याला शनिवार (ता. 8) पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने असे कृत्य का केले, याचा या पाच दिवसांत खुलासा होईल, अशी आशा तपास अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

वडील म्हणतात, हे काय केले?

आरोपी विकेशचे वडील ज्ञानेश्वर नगराळे यांना या घटनेबाबत विचारले असता, मुलाने हे काय केले..? असा प्रश्‍नच त्यांनी शोकमग्न अवस्थेत विचारला. त्या मुलीला जिवंत जाळण्याची कृती चुकीचीच आहे. त्या कृत्याचे मी व माझे कुटुंबीय समर्थन करणार नाही, असे वडिलांनी यावेळी सांगितले. माझा भाऊ कधीच कोणत्याच बाबतीत पुढच्या परिणामाचा विचार करीत नसे व आता त्याने सगळे होत्याचे नव्हते करून ठेवले, अशी व्यथा त्याच्या लहान बहिणीने मांडली. परंतु, या सगळ्या घटनाक्रमात आमची काहीही चूक नसताना आम्हाला मात्र सध्या दहशतीच्या वातावरणात राहावे लागत असल्याचे मत नगराळे कुटुंबीयांनी व्यक्त केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT