adarsh mashte from gondpipari climbed 4220 meter mountain 
विदर्भ

गोंडपिपरीच्या आदर्शने 'माउंट पतालसू'वर फडकविला तिरंगा, 4220 मीटर उंच शिखर केले सर

आनंद चलाख

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर ) :  आदर्श साईनाथ माष्टे या तरुणाने मनाली येथील चार हजार 4220 मीटर उंच शिखर सर केले. महाराष्ट्रातून केवळ दोन तरुणांनी ही कामगिरी बजावली. पर्वतरांगा सर केल्यानंतर तिरंगा फडकवित आदर्शने मोहिम फत्ते केली. गोंडपिपरी तालुक्‍यात आदर्शच्या कामगिरीची माहिती कळताच अनेकांनी अभिनंदन करीत कौतुक केले.

परिवारातील थोरामोठ्यांकडून मिळालेला आदर्श घेत गोंडपिपरी शहरातील आदर्श साईनाथ माष्टे याने हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ग्रीन व्हॅली ऍडव्हेंचर गृपतर्फे आयोजित हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगामधील माउंट पतालसू नावाचे चार हजार 4220 मीटर ऊंचीचे पर्वत यशस्वीपणे सर केले. असे करत त्याने युवा पिढीपुढे आपल्या धाडसाचा नवा आदर्श ठेवला आहे. एवढेच नाही तर येत्या दिवसांत अशा धाडसी कारवायात सातत्य ठेवण्याचा त्याचा विचार आहे. भविष्यात संरक्षण खात्यात काम करण्याची आवड असलेल्या आदर्शला सदैव कुटुंबीयांकडून प्रेरणेचे धडे दिले जात आहेत. 

आदर्श तोहोगाव येथील भारतीय माध्यमिक तथा स्व.बाजीरावजी मून उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या बारावीचा विद्यार्थी आहे. धाडसी कवायतीची आवड असलेल्या आदर्शला खरी प्रेरणा पुलगावच्या इंडियन मिलीटरी स्कूलमधून मिळाली. तेथील प्रा. प्रवीण शेळके इंडियन माउंटेरिंग फाउंडेशन, दिल्लीचे सदस्य आहेत. ते स्वतः सह धाडसी कवायतीसाठी इच्छूक विद्यार्थ्यांना पर्वतरांगावरील कवायतीसाठी नेत असतात. यातच आदर्शला धाडसी कवायतीत आवड असल्याने त्याची यासाठी निवड करण्यात आली. यावेळी राज्यातून यासाठी 2 मुले, 2 मुली आणि स्वतः प्रा. शेळके सरांनी या धाडसी मोहिमेत सहभाग घेतला. देशभरातून यात 22 व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यातील 18 व्यक्ती हिमालय पर्वतातील धौलाधार पर्वत रांगामधील माऊंट पतालसू नावाचे 4220 मीटर ऊंचीचे पर्वत सर करण्यापूर्वी काढता पाय घेतला आणि माघारी परतले. मात्र, आदर्श आणि त्याच्या महाराष्ट्रातील इतर सहकाऱ्याने हार न मानता 4220 मीटरची पर्वतरांग सर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT