Aditya Jivane
Aditya Jivane e sakal
विदर्भ

मृत्यूला हरवून UPSC उत्तीर्ण, सेल्फ स्टडी करून साकारलं अधिकारी होण्याचं स्वप्न

बालकदास मोटघरे

आनंदवन (वरोरा) : कुठलीही शिकवणी न लावता घरीच राहून अभ्यास केला. मे महिन्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) मुलाखत होती. मुलाखतीच्या तयारीसाठी तो दिल्लीला गेला आणि मित्रांच्या संपर्कात येऊन कोरोना पॉझिटिव्ह झाला. सिटी स्कॅन केल्यानंतर स्कोअर पाहून त्याला धक्का बसला. कारण, त्याचा एचआरसीटी स्कोअर (HR-CT) १८ होता. तरीही हिंम्मत न हारता त्याने कोरोनाला हरविले आणि यूपीएसएसीची (UPSC Interview) मुलाखत दिली आणि त्याचे अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झाला. ही यशस्वी कहाणी (UPSC success stories) आहे, वरोरा येथील आदित्य जीवने या विद्यार्थ्याची.

आदित्यचे दहावीपर्यंतचे शिक्षण वरोरा येथील सेन्टेन्स अनिस पब्लिक स्कूलमध्ये झाले. दहावीमध्ये त्याला 92 टक्के गुण प्राप्त झाले. त्यावेळी वडिलांनी यूपीएससीचे पुस्तक आदित्यला भेट दिले आणि तिथूनच त्याला अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली. नागपूर येथील नारायणा पब्लिक स्कूलमधून बारावी परीक्षा पास करून यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून केमिकल इंजिनियरची पदवी घेतली. त्यानंतर 2018 पासून वरोरा येथील स्वतःच्या घरी राहून मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करून UPSC चा अभ्यास केला. त्याने दुसऱ्याशी स्पर्धा न करता स्वतःसोबतच स्पर्धा करून यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. मागच्या परीक्षेत मुलाखतीला जाऊन यश प्राप्त झाले नाही. मात्र, त्याने थोडंही विचलीत न होता अभ्यास सुरू ठेवला आणि त्याला यश आले.

दिल्ली येथे मे महिन्यात यूपीएससीच्या मुलाखती असल्याने एप्रिल महिन्यातच तो दिल्लीला गेला. त्याकाळात दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर होता. त्यात त्याचा मित्र पॉझिटिव्ह आला. त्याला मदत करताना आदित्यसुद्धा पॉझिटिव्ह आला. त्याचा स्कोअर १८ होता. त्यानंतर महाराष्ट्रातील अधिकारी यांच्या मदतीने दिल्ली येथील रुग्णलयात भरती झाला आणि तिथेच त्याचा मृत्यूशी संघर्ष सुरू झाला. त्याने मृत्यूला हरविले. त्यासाठी दिल्ली येथे कार्यरत असलेले महाराष्ट्रातील आयपीस अधिकारी स्वागत पाटील, हैदराबाद पोलिस अधीक्षक महेश भागवत, मुंबई आयआरएस नितेश पाथोडे, तामिलनाडूच्या राज्य पोलिस सचिव आनंद पाटील यांनी कोरोनाच्या काळात मदत केली आणि कोरोनाला हरवून आदित्य वरोरा येथे परतला. काही दिवस येथील डॉ. खापणे यांच्या मार्गदर्शनात उपचार घेऊन त्यांनी परत मुलाखतीची तयारी सुरू केली. 17 ऑगस्टला मुलाखत दिली आणि तो 399 रँक प्राप्त करून आज यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

आदित्यचे वडील चंद्रभान जीवने हे आनंद निकेतन महाविद्यालयात वाणिज्य प्रमुख आहेत, तर आई जिल्हा परिषदेला शिक्षिका आहेत. आदित्यने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, बहीण, अनुजा, काका, मामा यांना दिले आहे.

मी तयारी करताना स्वतःची स्पर्धा स्वतःशी केली. इंटेनट आणि आधुनिक साधन समुग्रीचा वापर करून घरीच तीन वर्षांपासून अभ्यास केला. यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली जाणे महत्वाचे नसून तुम्ही मेहनत कशी घेता यावर तुमचे यश असते.
-आदित्य जीवने, वरोरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT