gadchiroli
gadchiroli 
विदर्भ

लॉकडाउनचा असाही फायदा; आरोग्य सुधारून आला नात्यात ओलावा 

सकाळ वृत्तसेवा

सिरोंचा (जि. गडचिरोली) : कोरोना विषाणूच्या महाभयंकर साथरोगापासून बचाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन घोषित केल्याने संपूर्ण बाजारपेठ, हॉटेल, सिनेमागृहे, दळणवळण बंद झाले. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असला तरी या संकटातही सकारात्मकता जपणाऱ्या अनेकांचे आरोग्य सुधारून त्यांच्या नात्यात ओलावा निर्माण होत आहे. 

एकेकाळी सिरोंचा तालुक्‍यात एसटीची बसफेरी नव्हती. त्यावेळी दुसऱ्या गावाला जाणे किंवा कोणताही कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ असो गावातील बैलबंडी सजवून त्यातून जात होते. या लॉकडाउनमुळे आज पुन्हा काही नागरिक बैलबंडीने एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. लॉकडाउनपूर्वी सर्व सुविधा असल्या, तरी या काळात जीवनात प्रचंड धावपळ होती. अनेक नागरिक रस्त्यावरचे अन्न खात होते. चायनीज फूड, बर्गर, पिझ्झा, चिकन, मटण जास्त प्रमाणात सेवन करत असल्याने नागरिकांच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत होते.

नाते आले जवळ

मात्र, गेल्या एक महिन्यापासून लॉकडाउन काळात हॉटेल बंद असल्याने नागरिक बाजारातील भाजीपाला त्यातही मुख्यत: चवळी, पालक, माठा अशा आरोग्यवर्धक भाज्या खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे. लॉकडाउनपूर्वी नागरिक अनेक कारणांनी एकमेकांपासून दूर राहून फक्त भ्रमणध्वनीद्वारे बोलत होते किंवा व्हिडिओ कॉल करून एकमेकांची सुखदुःखे विचारत होते. आता बाहेरगावी असलेले नागरिक स्वगावी आल्याने कुटुंबातील सदस्य एकत्र जमा झाल्याने दुरावा दूर होऊन नाते जवळ आल्याचे चित्र दिसत आहे. कुटुंब एकत्र झाल्याने वृद्ध आणि कुटुंबातील मोठी माणसे आनंद व्यक्त करीत आहेत. दिवसभर घरातील सगळे सदस्य घरात एकत्र बसून गप्पागोष्टी करीत असल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. 

घरच्या पदार्थांची चव... 

लॉकडाउनपूर्वी छोट्या खेड्यातही चिप्स, चॉकलेट, तळलेले पदार्थ खाल्ले जायचे. हॉटेलचे समोसे, कचोरी, इडली, डोसा, ढोकळा असे कित्येक पदार्थ नागरिक खायचे. पण, आता लॉकडाउनमुळे घरीच बसल्याने घरातील विशेषत: पारंपरिक पदार्थांची चव नागरिक घेत आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT