File photo 
विदर्भ

रेल्वेवर झळकणार जाहिराती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : तिकीट विक्रीशिवाय अन्य स्रोतांद्वारे उत्पन्नवाढीवर रेल्वेने भर दिला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानेही उत्पन्नवाढीसाठी "काहीही'ची री ओढल्याचे दिसून येते. पैसे मोजणाऱ्यांना रेल्वे इंजिन, डबे, मालगाडी असे कुठेही त्यांच्या जाहिराती लावण्याची परवानगी दिली जाणार आहे.
माल आणि प्रवासी वाहतूक भारतीय रेल्वेच्या उत्पन्नाचे सर्वांत मोठे स्रोत आहे. त्याशिवाय अभिनव योजनांद्वारे उत्पन्न वाढविण्याचे निर्देश भारतीय रेल्वेने दिले आहे. त्यानुसार उत्पन्नासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे. त्यातूनच धावत्या रेल्वेत प्रवाशांची मसाज करण्याची कल्पना पुढे आली होती. सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर ती उपाययोजना मागे पडली. परंतु, इलेक्‍ट्रिक यंत्राद्वारे मसाजसारखी सुविधा रेल्वेस्थानकांवर सुरूच आहे. उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून जाहिरातींवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर जाहिरातींसाठी डिजिटल बोर्डही लावले गेले आहे.
आता रेल्वे इंजिनसह प्रवासी व मालगाड्यांवरही जाहिराती लावण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. जाहिरातदारांचा शोध घेण्याच्या दृष्टीने नागपूर विभागातर्फे शुक्रवारी बैठकही घेण्यात आली. त्यात विदर्भ आणि मध्य प्रदेशातील जाहिरात कंपन्यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या बैठकीत रेल्वेगाड्यासुद्धा जाहिरातींसाठी उपलब्ध असल्याची माहिती वाणिज्य निरीक्षक तारा प्रसाद आचार्य यांनी दिली. सोबतच नवा स्रोत असल्याने जाहिरातींसाठी पुढे येण्याचे आवाहनही कंपन्यांच्या प्रतिनिधींना करण्यात आले.
सहायक वाणिज्य व्यवस्थापक व्ही. सी. थूल यांनी जाहिरात कंपन्यांशी संबंधित अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. बैठकीला विभागीय वाणिज्य निरीक्षक, जनसंपर्क निरीक्षक, खंड वाणिज्य निरीक्षकही उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT