After Fourteen days he found in Well at Ramtek District nagpur
After Fourteen days he found in Well at Ramtek District nagpur 
विदर्भ

तब्बल चौदा दिवसानंतर 'ती' विहिरीत सापडली जिवंत

राजू कापसे

रामटेक (जि. नागपूर) : चौदा दिवसानंतर मानेगावटेक येथिल रहिवाशी पण थोडी वेडसर महिला विहिरीत सापडली. आज सकाळी सातच्या सुमारास विहिरीवरील मोटार सुरु करण्याकरीता नोकर गेला असता त्याला पाईप धरुन बसलेली ती महिला दिसली. त्याने याची माहिती मालकाला दिली व तिला विहिरीतुन सुखरुप बाहेर काढण्यात आले.

सदर महिलेचे नाव सुनिता जयचंद सिरसाम वय(30) असुन ती नजीकच्या मानेगाव टेकची आहे. ती दोन ते तीन तासाआधी विहिरीवर गेली असावी आणी तिला झोप वगैरे येत असल्याने पडली असावी असा अंदाज जानकरांनी व्यक्त केला आहे.

सुनिता सिरसाम ही वेडसर महिला असून ती २१ ऑक्टोबर रोजी तिने सकाळी मतदान केले व घरी शेतात जाते असे सांगुन घरुन निघुन गेली. तेव्हा पती जयचंदने शेजाऱ्याच्या मदतीने, दुसऱ्या दिवशी देवलापार पोलिस स्थानकात तक्रार दिल्याचे सांगीतले. सदर महिला या भागातच फिरत होती. तरीही पोलिसांनी कोणताही दखल घेतली नाही असा आरोप आज उपस्थितांनी केला आहे. 

आज चौदा दिवसानंतर ती सापडली आहे. ती तब्बल चौदा दिवसांनंतरही जिवंत असल्याने सर्वांनी धावपळ केली. दिनेश दुबे, भैया टेकाम, परवेज ऊईके, विजय ठाकुर, शिवा नखते, मोसीन अंसारी, गणेश नेवारे व काही वाहन चालकाच्या मदतीने तिला विहिरीत काही काढण्याचा प्रयत्न केला परंतू काढणे शक्य होत नसल्याने बाज विहिरीत टाकून तिला वर काढण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT