dddd.jpg 
विदर्भ

अकोल्यात पुन्हा तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता.28) प्राप्त झालेल्या 42 अहवालापैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 39 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूणच आता पॉझिटिव्ह आलेल्यां अहवालांची संख्या 19 झाली असून, प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या रुग्णांची नऊवर जाऊन पोहचली आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालात एक महिला असून, ती सिंधी कॅम्प भागातील रुग्णाची पत्नी आहे. तर दुसरा रुग्ण हा त्याचाच नोकर आहे. हा नोकर 31 वर्षाचा असून, तो भीमनगर येथील रहिवासी आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह अहवाल हा फेरतपासणीचा असून, तो बैदपुरा येथील तीन वर्षीय बालक आहे. आता एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या 19 झाली असून , प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

सिंधी कॅम्प परिसरसह कृषी नगरही सील
पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा कृषी नगराच्या भीमनगर भागातील रहिवासी असल्याने आता हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. आता या भागातील रहिवासी बाहेरील भागात व बाहेरील व्यक्ती या भागात जाऊ अथवा येऊ शकणार नाहीत. या भागातील प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच या व्यक्तीच्या संपर्कांचाही तपास करण्याचे काम सुरु झाले आहे.

नागरिकांनो घरातच थांबा
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास ती लपवू नका. तत्काळ डॉक्टरांना वा शासकीय रुग्णालयात दाखवा. लक्षणे लपवून राहू नका. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नका. बाहेर पडतांना मास्क लावा. कोणाही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा. घरी आल्यावर साबणाने हात धुवा. स्वच्छता राखा असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT